...तर विमानातही मोबाईल वापरू शकता
विमानातून प्रवास करतानाही मोबाईलचा वापर करता येण आता पर्यंत शक्य नव्हत पण यापुढे असे नसेल. दूरसंचार नियामक ट्रायने हवाई प्रवासादरम्यान विमानात मोबाईल सेवांना परवानगी देण्यावर विचार सुरू केला आहे. या विषयावर नियम निश्चित करण्यासाठी एक सल्ला प्रक्रिया सुरू केली आहे.
नवी दिल्ली: विमानातून प्रवास करतानाही मोबाईलचा वापर करता येण आता पर्यंत शक्य नव्हत पण यापुढे असे नसेल. दूरसंचार नियामक ट्रायने हवाई प्रवासादरम्यान विमानात मोबाईल सेवांना परवानगी देण्यावर विचार सुरू केला आहे. या विषयावर नियम निश्चित करण्यासाठी एक सल्ला प्रक्रिया सुरू केली आहे.
यासंबंधीचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. उड्डाणा दरम्यान फोन वर बोलण्यासंदर्भातील सूचनेवर आपले मत मांडण्याचा आग्रह १० ऑगस्ट २०१७ रोजी दूरसंचार विभागाने ट्राय ला केला होता. तरतुदींसाठी परवाना अटी व शर्तींच्या शिफारसी देण्यासाठीही विनंती केली होती. आयएफएची वाढती मागणी लक्षात घेऊन हा पुढाकार घेण्यात येत आहे. याबाबबत २७ ऑक्टोबरपर्यंत मत आणि सूचना स्वीकारल्या जाणार आहेत.