नवी दिल्ली : जगातले सर्वात मोठे मॅसेजिंग ऍप असलेल्या व्हाट्सअपला (Whatsapp) टक्कर देण्यासाठी टेलिग्राम (telegram) या मॅसेजिंग ऍपने कोणतीही कसर सोडलेली नाही. आपल्या नव्या अपडेटमध्ये टेलीग्रामने ते सर्व फीचर्स दिले आहेत, जे व्हाट्सअपमध्ये मिळतात. टेलिग्राममध्ये गृप कॉल फीचर्समध्ये सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये ऍनिमेटेड बॅग्राऊंड, मॅसेज सेंड करताना वापरण्यात येणारे इमोजी अपडेट केले आहे. टेलीग्राम गृप व्हिडिओ कॉलने ३० लोकांशी जोडता येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा करा व्हिडिओ कॉल
-  तुमच्या स्मार्टफोनमध्ये टेलीग्राम ऍप ओपन करा.
- कोणत्याही गृप चॅट विंडोवर जा आणि हेडरवर टॅप करा
- येथे तुम्हाला गृप मेंबर्स आणि नोटिफिकेशन सेटिंग्ससह गृपशी संबधीत इतर माहिती दिसेल
- आता वर उजव्या कॉर्नरला असलेल्या तीन डॉटवर टॅप करा. 'स्टार्ट वॉईस कॉल' पर्यायाला क्लिक करा. आता तुम्हाला एक नवीन पॉप-अप विंडो दिसेल. जिथे तुम्ही त्या मेंबर्सला सिलेक्ट करू शकता. ज्यांना तुम्ही गृप कॉलमध्ये शामिल करू इच्छिता.
- टेलीग्रामच्या गृप कॉलमध्ये Only admins can talk अशीदेखील खास सुविधा मिळणार आहे. 


टॅब आणि डेक्सटॉपचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांनी व्हिडिओ कॉलच्या दरम्यान, वेगवेगळे फीचर्स मिळतील. या दरम्यान, स्क्रीन स्पिट करून व्हिडिओ ग्रीड आणि सहभागी लोकांची यादी पाहता येईल.  डेक्सटॉप वापरकर्ते आपल्या आवडीनुसार स्क्रीन शेअर करू शकतील.