मुंबई : Mosquito : पावसाळ्यात घरांमध्ये डासांचा सर्वाधिक त्रास होतो. डासांपासून सुटका करण्यासाठी लोक मच्छर अगरबत्ती किंवा कॉइल वापरतात. परंतु डासांची संख्या जास्त असल्याने कॉईलही निकामी ठरते. डासांपासून सुटका होण्यासाठी असा एक खास दिवा (Lamp) आहे की तो आणला तर तुमचा होणार त्रास संपेल. किंवा तुमची समस्या दूर होईल. हा एक मच्छर मारणारा दिवा आहे, जो काही मिनिटांत डासांना मारतो.  त्याबद्दल जाणून घ्या.


प्रकाशाकडे आकर्षित होऊन डास मरतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिव्यातील प्रकाश महत्वाची भूमिका बजावतो. दिव्यातील प्रकाशाकडे डास आकर्षित होऊन मरतात. तुम्ही तो बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये किंवा ऑफिसमध्येही ठेवू शकता. हे मॉस्किटो किलर दिवे अतिशय हलके आणि स्टायलिश डिझाइनमध्ये येतात. डास मारण्यासोबतच ते दिव्याचेही काम करेल. त्यातून एक निळा प्रकाश निघतो, जो डास मारण्यास मदत करतो. हा दिवा उडणाऱ्या डासांना 20 चौरस मीटरच्या अंतरावरून आकर्षित करतो.


भारतात या किलर लॅम्पची किंमत


हा मच्छर मारणारा दिवा तुम्हाला बाजारात सहज मिळेल. बाजारात डास मारण्यासाठी रॅकेटही उपलब्ध आहेत, जे खूप लोकप्रिय आहेत. पण हा दिवा कोणताही प्रयत्न न करता डासांना मारतो. एकीकडे रॅकेट 200 ते 300 रुपयांना मिळते, तर दुसरीकडे हा दिवा 199 रुपयांना विकत घेता येतो.


जर तुम्हाला ऑनलाइन खरेदी करायची असेल तर Amazon वरुन 199 रुपयांना खरेदी करता येईल. दिव्या खाली एक ट्रे देखील आहे, ज्यात मृत डास गोळा होतात. तो भरल्यावर तुम्ही मेलेले डास बाहेर टाकू शकता.