WhatsApp: WhatsApp माहिती नसलेला किंवा WhatsAppचा वापर न करणाऱ्या सध्या एकही व्यक्ती सापडणार नाही. WhatsApp हे मेसेजिंग अॅप सगळ्यात पसंदीत अॅप आहे. WhatsApp द्वारे आपण इन्स्टंट मेसेज करु शकतो. WhatsApp मधील ग्रुप चॅटिंगद्वारे आपण एकाच वेळी अनेकांशी बोलू शकतो. पण WhatsApp ग्रुपमधील एखाद्या ग्रुपमध्ये आपले सगळेच ओळखीचे असतात असं नाही. अशावेळी आपला नंबर अनपेक्षित किंवा अनोखळी माणसाकडे जातो. त्यातून अनेक वेळा आपल्या डोक्याला मनस्ताप होतो. पण आता WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. WhatsApp आता असं नवीन फीचर आणत आहे ज्यामुळे तुम्ही ग्रुपमध्ये असूनही इतर यूजर्सला तुमचा नंबर दिसणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यासंदर्भात माहिती WabiInfoने आपल्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे. WhatsApp हायसडिंग फोन नंबर या फीचरवर काम करत आहे. या फीचरचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचा सर्व चाचण्या पूर्ण होणार आहे. 


WhatsApp हे यूजर्सफेण्डली असल्याने तो आपल्या यूजर्ससाठी वेळेनुसात सतत नवनवीन फीचर्स आणत असतो. आता WhatsAppवर सहजच व्हॉइस मेसेजही करु शकणार आहे. या फीचरमुळे तुम्ही एखाद्याचे स्टोरीज स्लो आणि फास्ट ऐकू किंवा वाचू शकता.