मुंबई - पुणे अवघ्या 30 मिनिटात? जगातल्या पहिल्या Flying Bike चं बुकिंग सुरु
लवकरच उडती कार येणार असं आपण ऐकलं होतं, पण आता चक्क उडती बाईक आली असून त्याचं बुकिंगही सुरु झालं आहे, पाहा कशी असणार जगातील पिहील Flying Bike
Flying Bike Booking : आतापर्यंत आपण बाईक रस्त्यावर धावताना पाहिली आहे. पण आता हीच बाईक चक्क उडताना दिसणार आहे (Flying Motorcycle). जगातील पहिल्या उडणाऱ्या बाईकचं बुकिंगही सुरु झालं आहे. अमेरिकन एव्हिएशन कंपनी जेटपॅकने (Jetpack Aaviation company) उडणाऱया बाईकचं बुकिंग सुरु केलं आहे. उडणाऱ्या बाईकमध्ये 8 दमदार जेट इंजीनचा (Jet Engine) वापर करण्यात आला आहे. यामुळे बाईक अवघ्या 30 मिनिटात 96 किमीचं अंतर गाठू शकणार आहे.
कशी आहे उडणारी बाईक?
उडणाऱ्या बाईकमध्ये चार जेट इंजिनचा वापर करण्यात आला आहे. पण अंतिम डिझाईनमध्ये 8 इंजिन बसवल्या जाणार आहेत. म्हणजे बाईकच्या चारही बाजूला प्रत्येकी दोन जेट इंजिन जोडल्या जातील. ही बाईक जवळपास 250 किमीचं वजन उचलण्यात सक्षम आहे. विशेष म्हणजे जमिनीपासून 16 हजार फूट उंचीपर्यंत ही बाईक उडू शकते.
उडणाऱ्या बाईकची किंमत किती?
उडणाऱ्या बाईकची निर्मिती करणाऱ्या जेटपॅक एव्हिएशन या कंपनीने बाईकचं बुकिंगही सुरु केलं आहे. या बाईकची किंमत अंदाजे 3.15 कोटी रुपये इतकी असेल. पुढच्या दोन ते तीन वर्षात ही बाईक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या बाईकच्या कंट्रोलिंग युनिटमध्ये सेंसरचा (Sensors in Controlling Unit) प्रयोग करण्यात आला आहे. या मुळे उड्डाण करताना प्रवासाची दिशा समजू शकेल. याबरोबरच उंच झाड किंवा इमारतीसारखा अडथळा आल्यास त्याची आपोआप माहिती मिळू शकेल, जेणेकरुन अपघात टाळता येईल.
या बाईकमध्ये फायटर जेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्लाई-बाय-वायर टेक्नॉलॉजीचा (fly-by-wire technology) समावेश करण्यात आला आहे. यात बाईकचं नियंत्रण हे बटनाद्वारे करण्यात येईल, म्हणजे टेक ऑफ लँडिग एका बटनाद्वारे होईल, तर उड्डाण घेतल्यानंतर वेग देण्यासाठी दुसऱ्या बटनाचा वापर होईल. पण उड्डाण घेतल्यानंतर प्रवासात इंधन संपलं तर , जमिनीवर उतरण्यासाठी पायलटला पॅराशूटही देण्यात आला आहे.