मुंबई : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामूळे एक दिवस जरी मोबाईल हातात नसले तर अनेकांना अस्वस्थ वाटू लागते. त्यात जर मोबाईल असून देखील सारखा स्लो होत असेल तर विचारूच नका. त्यामूळे मोबाईल सुरळीत चालण्याच्या काही टीप्स आपण आज जाणून घेऊया..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरतर मोबाईलची इंटरनल मेमरी जेवढी जास्त तेवढा मोबाईल चांगले काम करु शकतो. बऱ्याचदा खूप सारे फोटोस, व्हिडिओ, एप्स यामूळे मोबाईल स्लो होऊन जातो. 
पण हे जास्त डेटा खाणाऱ्या अशा फाईल्स आपण गुगल ड्राइव्ह मध्ये सेव्ह करुन ठेवू शकतो. किंवा गरजेचे नसलेले अॅप्स अनइन्स्टॉल करुन ठेवू शकतो. ज्यामूळे जास्तीत जास्त स्पेस तुम्ही वापरू शकता. 


१) फोनमध्ये कोणते पेन्डींग अपडेट असेल तर हे प्रकरण पहिल मिटवा. सेटिंगमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून तुम्ही फोन अपडेट करू शकता.


२)वॉलपेपर हे फोनमध्ये अधिक स्पेस घेतात. त्यामूळे मोबाईल स्लो होऊन जातो. मोबाईलमधून लाईव्ह वॉलपेपर हटवून तिथे फोटो वॉलपेपर ठेवू शकता. 


३)फोनमधल्या जंक फाईल आणि कॅचे फाईलला वेळोवेळी डिलीट करत रहा. काही अॅप्सच्या माध्यमातूनही हे काम केले जाऊ शकते.


४) डिव्हाईसमध्ये काही डुप्लीकेट कॉंटॅक्ट सेव्ह होऊन जातात यांना काळजीपूर्वक डिलीट करुन टाका.