मुंबई :  ३१ डिसेंबरला १२ च्या ठोक्याला अनेकजणांना त्यांच्या प्रिय व्यक्तीला, मित्रपरिवाराला नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. पण तासभर व्हॉट्सअ‍ॅप बंद असल्याने सारेच ठप्प झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअ‍ॅप अशाप्रकारे बंद होण्याची ही काय पहिलीच वेळ नव्हे. पण वारंवार व्हॉट्स अ‍ॅप मध्ये असे का होते ? हा प्रश्न तुमच्याही मनात डोकावला असेल. व्हॉट्सअ‍ॅप बंद पडल्यानंतर 'Unfortunately, WhatsApp has stopped और 'your WhatsApp is not responding' असा मेसेज येतो.  


व्हॉट्स अ‍ॅप क्रॅश का होते ? 


व्हॉट्स अ‍ॅपचे सुमारे १ बिलियन युजर्स  आहेत. क्रॅश झाल्याची माहिती मिळाली की सहाजिकच युजर्सचा गोंधळ उडतो. यामुळेच अनेकदा सर्व्हरवर लोड आला की व्हॉट्स अ‍ॅप बंद होते.  मग हा तांत्रिक बिघाड दुरूस्त केला जातो. 


तुमच्या फोनमध्ये व्हॉट्स अ‍ॅप क्रॅश होऊ नये असे वाटत असेल तर हे काही मार्ग नक्की आजमावून पहा.  


मेसेजचा मोह सोडा 


चॅट सेव्ह करून ठेवणं टाळा. जेव्हा खूप चॅट्स सेव्ह राहतात तेव्हा व्हॉट्स अ‍ॅप क्रॅश होण्याचा धोका वाढतो. नियमित चॅट डिलिट करायची सवय ठेवा.  


कॅशे क्लिअर करा  


व्हॉट्स अ‍ॅप क्रॅश होऊ नये असे वाटत असेल तर तुमच्या मोबाईलमधून एप्लिकेशन मॅनेजरमध्ये दिलेला 
Clear Cache हा ऑप्शन फायदेशीर ठरतो. कॅशे क्लिअर केल्यानंतर फोनवरचा ताण कमी होतो.  


अपडेट टाळू नका 


अनेकदा युजर्स नवीन अपटेस टाळतात. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सतत प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे तुम्हांला नवे अपडेट मिळाला की तो स्विकारा. यामुळे युजर्सना फायदा होतो.  


सिमकार्ड बदलणे  


नवा मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर तो रजिस्टर केल्यानंतरच व्हॉट्स अ‍ॅपमध्ये सुरू केला जाऊ शकतो.  एका मोबाईलमध्ये दोन क्रमांक व्हॉट्स अ‍ॅपवर सुरू होत नाहीत.  


रि - इन्स्टॉल करावे 


तुमचे व्हॉट्सअ‍ॅप वरीलपैकी कोणत्याच उपायांनी सुरू होत नसेल तर तुम्हांला ते पुन्हा इंस्टॉल करावे लागेल. अनेकदा या पर्यायामुळे पुन्हा व्हॉट्स अ‍ॅप सुरू करायला मदत होते.