तापी : गुजरातमधील तापी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे, या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कैद झाल्याने, अपघात किती भीषण आणि कोणत्याही क्षणी, ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे होऊ शकतो, हे उदाहरण पुन्हा समोर आलं आहे. या तिहेरी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. एका कारच्या डॅशबोर्डवरील कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आहेत. ट्रक ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला आहे. रस्ता क्रॉस करताना आयशर ट्रकच्या ड्रायव्हरने कोणताही विचार केलेला दिसत नाही, मात्र त्याची ही चूक छोटीशी नाही, कारण त्यामुळे एकाला जीव गमवावा लागला आहे.