नवी दिल्ली : ट्रायम्फ या कंपनीने त्यांची प्रीमियम बाईक स्ट्रीट ट्रिपलचं नवं मॉडल लॉन्च केलं आहे. या बाईकचं नाव स्ट्रीट ट्रिपल ७६५ आरएस असं आहे. भारतात या बाईकची किंमत १०.५५ लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रायम्फ इंटरनॅशनल मार्केटमध्ये आधीपासूनच या बाईकचे तीन व्हेरिएंट विकत आहे. या नवीन जनरेशन बाईकचं भारतातील हे दुसरं व्हेरिएंट आहे. याआधी भारतात स्ट्रीट ट्रिपल एस मॉडल लॉन्च करण्यात आलंय. या बाईकचं डिझाईन जुन्या स्ट्रीट ट्रिपल एस मॉडलसारखंच आहे. पण यत नवीन आणि स्पोर्टी एन्ड मिरर, रिअर सीट काऊल देण्यात आले आहे. सिल्वर आणि ब्लॅक पेंटमध्ये ही बाईक उपलब्ध असेल. 


या जुन्या मॉडलप्रमाणेच इंजिन देण्यात आलं आहे. पण शक्तीच्या बाबतीत ही नवीन बाईक अधिक दमदार आहे. ही बाईक ११,७०० आरपीए १२३ बीएसपीची पावर जनरेट करते. सोबतच १८८०० आरपीएमवर ७७ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. या नव्या मॉडलमध्ये ब्रेम्बो ब्रेक्स आणि मागे मोनोशॉक अब्जॉर्बर देण्यात आलं आहे. 


या बाईकच्या इंजिनला ६ स्पीड ट्रान्समिशन देण्यात आलंय. यासोबतच यात ५ ड्रायव्हिंग मोड्स, रेन, स्पोर्ट, रेस, रायडर आणि ट्रॅक देण्यात आले आहे. तसेच चार लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, रोड, रेन, ट्रॅक आणि ऑफ रोडिंगचेही फिचर्स देण्यात आले आहे. १६६६ किलो वजन असलेली ही बाईक जुन्या मॉडेलच्या तुलनेत २ किलोने कमी करण्यात आली आहे.