TV On Mobile Without Internet: तंत्रज्ञानाचं युग असून झटपट बदल होत आहेत. काल परवा चर्चेत असलेलं तंत्रज्ञान जुनं होत आहे. डीटीएच येण्यापूर्वी टीव्हीसाठी केबल आवश्यक होतं. त्यानंतर डीटीएच सेवा आली आणि आता मोबाईलवर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येते. मोबाईलवर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. पण अनेकदा मोबाईलवर लाईव्ह स्ट्रिमिंग किंवा टीव्ही पाहताना अनेक अडचणी येतात. कारण इंटरनेटचा स्पीड याला कारणीभूत ठरतो. मात्र भविष्यात तुम्हाला मोबाईलवर टीव्ही पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही बातमी खरी असून सरकार नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. यामुळे मोबाईलवर टीव्हीचा अॅक्सेस मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही. दूरसंचार विभागानं याबाबतचं ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केलं आहे. कंपन्यांना एक मिडलवेअर लावावं लागेल. या माध्यमातून मोबाईलपर्यंत टीव्हीचा अॅक्सेस पोहोचेल. 


तंत्र कसे कार्य करेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, युजर्सना इंटरनेटच्या मदतीशिवाय त्यांच्या फोनवर टीव्ही पाहता येणार आहे. पूर्वी एंटेना लावल्यानंतर थेट टीव्ही पाहता येत होतं अगदी तसंच हे तंत्रज्ञान असणार आहे. पण आता यासाठी तुम्हाला वेगळ्या हार्डवेअरची गरज भासणार नाही आणि मोबाईलच्या वायफाय अँटेनाच्या मदतीने यूजर्स फोनवर मोबाईल पाहू शकतील. यूजर्स फोनमध्ये फ्री टू एअर चॅनेल सहज पाहू शकतील.


बातमी वाचा- iPhone 15 ची जोरदार चर्चा, टिपस्टर्सने जारी केलेली किंमत आणि फीचर्स जाणून घ्या


कारमध्येही टीव्ही पाहता येणार


सरकारी अधिसूचनेनुसार, कंपन्यांना यासाठी मिडलवेअर इन्स्टॉल करावे लागेल. यामुळे मोबाइल फोनमध्ये डायरेक्ट टीव्ही अॅक्सेस करण्यास अनुमती देईल आणि लोक डेटाशिवाय फ्री-टू-एअर चॅनेल पाहू शकतील. सरकारच्या या पाऊलामुळे ग्रामीण भागात टीव्हीची पोहोच वाढणार आहे. चालत्या कारमध्येही लोकं विना अडथळा टीव्ही पाहू शकतील.