सियोल : इंटरनॅशनल कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो (सीईएस) २०१८ मध्ये एलजी इलेक्ट्रॉनिक्स आवाजावर चालणारा टी.व्ही. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्लेटफार्म 'डीपथिनक्यू' संचालित आधुनिक टेलीव्हिजन सादर करतील. दक्षिण कोरियातील दिग्गजांनी सांगितले की, २०१८ मध्ये प्रिमीयम टी.व्ही. सादर होईल. ज्यात ओएलईडी टी.व्ही. थिनक्यू आणि सुपर अल्ट्रा एचडी टी.व्ही. थिनक्यू यांचा समावेश आहे.


कसा असेल टी.व्ही.?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात युजर्सला अनेक सुविधा उपलब्ध होतील. यात महत्त्वाचे म्हणजे आवाजावर टी.व्ही. चालेल. यात तुम्ही तुम्हाला जे पाहायचे आहे त्याचे संदेश बोलून टी.व्ही. ला देऊ शकता.


एलजी ने सांगितले की, तुम्ही टी.व्ही. ला प्रश्नही विचारू शकता. म्हणजे जो चित्रपट मी बघत आहे त्याचे मुख्य कलाकार कोण कोण आहेत. याचे उत्तर तुम्हाला मिळेल. हा टी.व्ही. हाय डायनॅमिक रेंजवर चालेल. त्यामुळे डिस्प्ले गुणवत्ता उत्तम असेल. हा टी.व्ही. टीवी डॉल्बी एटमॉस प्रणाली वर काम करेल. त्यामुळे आवाजाची गुणवत्ता देखील चांगली असेल.


लिमिटेड एडिशन्स


यापूर्वी  'सिग्नेचर सीरीज'  लिमिटेड एडिशन्स भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आले होते. एलजीने डिसेंबर २०१७ मध्ये घरेलू मार्केटमध्ये सिग्नेचर एडिशन लॉन्च केले. सिग्नेचर एडिशन हे एलजीच्या ग्राहकांसाठी एक्सक्लूझिव्ह पद्धतीने लॉन्च केले. हे एक लिमिटेड एडिशन मॉडेल आहे. हे बनवण्यासाठी जिरकॉनियम सेरेमिक शेलचा वापर करण्यात आला होता.


मुंबईत कार्यक्रम


एलजीने ५ जानेवारीला मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात कंपनी किती डिव्हाईस लॉन्च करणार हे ठरवण्यात आलेले नाही. एलजी सिग्नेचर एडिशन स्क्रॅच प्रुफ आहे आणि ब्लॅक अॅण्ड व्हाईट रंगात मिळेल.