मुंबई : बाईक निर्मिती करणारी कंपनी टीव्हीएसने आपली लोकप्रिय बाईक स्पोर्टस सिल्वर अलॉयची पुढची एडिशन लॉन्च केली आहे. या बाईकची किंमती ३९ हजारापेक्षा जास्त असणार आहे. ही स्पोर्ट सिल्वर अलॉय बाईक ३ रंगात उपलब्ध असणार आहे. ब्लॅक, सिल्वर आणि वॉल्कनो रेड या ३ रंगात असणार आहे. या बाईकचे आतापर्यंत २० लाख युनीट विकले गेले आहेत, त्यामुळे ही बाईक चांगलीच लोकप्रिय आहे. या बाईकला ९५ किलोमीटर प्रति इतके मायलेज देत असल्याचा दावा टीव्हीएस कंपनीने केला आहे. टीव्हीएस ही जरी स्पोर्टस बाईक असली तरी चांगल्या आरामदायी शॉकअप्समुळे या बाईकचा दीर्घकाळ चालवणाऱ्यावा जास्त त्रास होत नसल्याचं सांगण्यात येतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बाईकचं इंजीन कसं असणार आहे. या बाईकच्या इंजीनला ४ स्पीड गिअरबॉक्स असणार आहेत. टीव्हीएसच्या या बाईकचं इंजीन १०० सीसी ड्युरा-लाईफ, एअर-कुल्ड इंजीन असेल, ज्याला  7500 rpm वर 7.3 bhp पावर आणि 7500 rpm वर 7.5 Nm पीक टॉर्क जनरेट करता येईल.


टीव्हीएस बाईक चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते. बाईकच्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही चाकांमध्ये ड्रमबॉक्स देण्यात आले आहेत. कंपनीची नवी स्पोर्टस टीव्हीएसचं पेटेंड इकोनोमीटरला देण्यात आलं आहे, जे ईको आणि पावर मोडसोबत येतं. याशिवाय स्पोर्टसच्या टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील भागात ट्वीन शॉक ऑब्जर्वर आहेत.