नवी दिल्ली : १४व्या ऑटो एक्स्पोच्या दुस-या दिवशी इलेक्ट्रीक दुचाकी तयार करणारी कंपनी ट्वेंटी टू मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडने गुरूवारी स्मार्ट इलेक्ट्रीक स्कूटर फ्लो सादर केली. 


ट्वेंटी टू मोटर्सची खास स्कूटर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्कूटरच्या लॉन्चिंगसोबतच पुढील तीन वर्षात या स्कूटरचे दोन लाख यूनिट विकण्याचं लक्ष्य कंपनीने ठेवलं आहे. ट्वेंटी टू मोटर्स स्टार्टअप कंपनी असून सात हजार कोटींची गुंतवणूक करून उभारण्यात आली आहे. कंपनीचा प्लांट लवकरच काम सुरू करणार आहे. तसेच प्रत्येक वर्षी ५० हजार दुचाकी तयार करण्याचं त्यांचं लक्ष्य आहे. स्कूटरची खासियत म्हणजे ही स्कूटर रिव्हर्स सुद्धा घेता येणार आहे. 


किती आहे मायलेज?


स्कूटरमध्ये १०० टक्के एलईडी लॅम्प, ट्विन डिस्क ब्रेक, पोर्टेबल वायरलेस बॅटरी, स्मार्ट अ‍ॅप, क्रूझ कंट्रोल आणि रिव्हर्स मोडसहीत अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरची प्री-बुकिंग कंपनीने सुरू केली आहे. तर या स्कूटरची डिलिव्हरी या वर्षाच्या मध्यात सुरू होणार आहे. स्कूटरमध्ये लिथियम आयर्न बॅटरी दिली आहे जी पाच तासात पूर्ण चारज होऊ शकते. पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर ६० किमी प्रति तासाच्या वेगाने ८० किमीचं अंतर पार करू शकते. 


किती असेल किंमत?


तज्ञांच्या मते स्कूटरने ४ ते ५ किमी अंतर प्रवास करण्याचा खर्च केवळ १ रूपया येईल. स्कूटरची किंमत कंपनीने ७४ हजार ७४० रूपये इतकी ठेवली आहे. कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, स्कूटरमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स देण्यात आलं आहे. यामुळे स्कूटर दुरूनही शोधली जाऊ शकते. तसेच जिओ फेसिंग फीचर्समुळे ही स्कूटर चोरी होण्यापासूनही सुरक्षा मिळते. 


रिव्हर्स घेईल स्कूटर


कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, या स्कूटरची खासियत म्हणजे ही स्कूटर रिव्हर्स घेते. तसेच या स्कूटरमध्ये २.१ KW इलेक्ट्रीक मोटार लावण्यात आली आहे. ही मोटार १५० किलोग्रॅम वज उचलण्यात सक्षम आहे. 


जिओ फेसिंग फीचर


स्कूटरची खासियत म्हणजे ‘जिओ फेसिंग’ फीचर, जे अ‍ॅपच्या मदतीने काम करतं. या फीचरच्या मदतीने स्कूटरला सुरक्षित रस्त्यावर चालवलं जाऊ शकतं. स्कूटरमध्ये वापरलेली २.१ KWची इलेक्ट्रीक मोटर १०० आरपीएम वर ९० एनएमचा टार्क जनरेट करतं.