Twitter Bird is Back: काही दिवसांपूर्वी ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अतरंगी निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी (Twitter Blue Bird) श्वानाचा लोगो (Doge icon) ट्विटरसाठी वापरण्यात आला होता. त्यामुळे सर्व क्षेत्रातून मस्क यांच्यावर टीका होताना दिसत होती. अशातच आता मस्क यांनी आपला निर्णय मागे घेतला असून ट्विटर पुन्हा निळ्या चिमणीचा चिवचिवाट पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता मस्क यांच्या यु टर्नमुळे अनेकांनी आपल्या डोक्यावर हात मारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पेस एक्सचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी कोणत्या ना गोष्टीमुळे चर्चेत असतात. आपल्या भन्नाट कार्यपद्धतीमुळे त्यांच्या कामाची काहीजण स्तुती करतात, तर काही टीका. ट्विटर हॅक झालं की काय? अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना, मस्क यांनी मीम्स शेअर करून लोगो बदलल्याचं सांगितलं होतं. मात्र हा लोगो केवळ वेब व्हर्जनमध्येच दिसत होता. त्यानंतर आता निळी चिमणी परत आलीये.


Elon Musk यांनी का निर्णय घेतला?


ट्विटरचा लोगो बदलून डॉगे (Doge icon) केल्याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता दिली नाही. मस्क यांनी केलेल्या एका ट्विटची चर्चा होते आणि त्याचा थेट फायदा किंवा तोटा गुंतवणूकदारांना होतो. मस्क यांच्याच याच खोडसळवृत्तीमुळे त्यांच्यावर खटला देखील चालवण्यात आला होता. तेव्हापासून मस्क यांनी गुंतवणूकदारांना डिवचण्यासाठी हे ब्रम्हास्त्र तयार ठेवलंय.


आणखी वाचा - Twitter चा दे धक्का ! ट्विटर व्हेरिफाईडकडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट अनफॉलो


पाहा ट्विट - 



दरम्यान, ट्विटरचा लोगो जेव्हापासून डोगेकॉइन (Doge coin) झाला. डोगेकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे मस्क यांनी जुना स्क्रिनशॉट शेअर केला. एका नेटकऱ्याने ट्विटर विकत घ्या आणि त्याचा लोगो डोगे असा करा, असा सल्ला दिला होता. त्यावेळी मस्क यांनी चॅलेंज स्वीकारलं होतं. त्याचा स्क्रिनशॉट त्यांनी शेअर केला होता.


ट्विटरचा दे धक्का


ट्विटर व्हेरीफाईडकडून सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसात जवळपास 2 लाख 25 हजार अकाउंट्स अनफॉलो करण्यात आलेत. त्यामुळे ट्विटर वापरणाऱ्यांना मोठा धक्का बसलाय.