मुंबई : फेसबूक, इंन्स्टाग्रामप्रमाणेच अनेक जण ट्विटरवरही अॅक्टीव्ह असतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ट्विटरवरील एक ट्विट तब्बल १८ कोटींना (tweet sold for 18 crores) विकलं गेले आहे. ही माहिती सोशल मीडियावर येताच, प्रत्येकाकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटमध्ये काय आहे असं खास?


ट्विटरचे सहसंस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या एका ट्विटच्या(Twitter) लिलावाबाबत घोषणा केली होती. ट्विटरवर सगळ्यात पहिले जॅक यांनीच ट्विट केले होते. त्यांचं हेच क्रीप्टोकरन्सीमध्ये विक्री झाले आहे. 


जॅक डोर्सी यांचं ट्विट तब्बल २.४ मिलियन डॉलर म्हणजेच १८ कोटींना विकले गेले आहे. वैल्युएबल्स बाय सेंट या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ट्विटचा लिलाव झाला, ज्यामध्ये ब्रिज ओरेकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीना अॅस्ताविने हे ट्विट खरेदी केले आहे. 


एवढ्या पैशांचं करणार काय? 
डोर्सी यांनी मार्चमध्येच ट्विट करत सांगितलेले की, लिलावातून मिळणारे पैसे हे बिटकॉईनमध्ये रूपांतरित केले जातील. ज्याचा लाभ गिव डायरेक्टलीज आफ्रीका रिस्पॉन्सला दिले जाईल. ही संस्था कोरोनाचा फटका बसलेल्या आफ्रीकेतील कुटुंबियांना आर्थिक मदत करते.