Twitter Outage: गेल्या अनेक महिन्यांपासून इलॉन मस्क यांच्यामुळे चर्चेत असलेलं ट्विटर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर पुन्हा डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. डेस्कटॉप, ॲप दोन्हीवरून युझर्सना ट्वीट करण्यात समस्या येत आहेत. downdetector.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळपासून 6.30 वाजल्यापासूनच हजारो लोकांनी ट्विटर डाऊन असल्याची माहिती दिली.   


सकाळपासून ट्विटर डाऊन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

downdetector.in अनेक वापरकर्त्यांनी ट्विटर डाउन झाल्याची माहिती दिली. दरम्यान आज (29 डिसेंबर) सकाळी 6.13 वाजल्यापासून ट्विटर डाउन आहे. त्याचदरम्यान ट्विटरसंदर्भात 433 तक्रारी आल्या. भारतातील अनेक युजर्सना वेबसाईट उघडण्यात अडचणी येत आहेत. मोबाइल देखील अॅप कार्यरत करत नाही. 


भारतातील 'या' शहरांमध्ये अडचणी 


दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. ट्विटर वापरताना अडचणी येत असल्यामुळे वापरकर्त्यांकडून राग व्यक्त केला जात आहे. 


वापरकर्त्यांकडून संताप व्यक्त 


एका यूजर्सने लिहिले की, 'ट्विटर आज पुन्हा उघडत नाही. महिनाभरात माझ्यासोबत हे चौथ्यांदा घडले आहे. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, 'इलॉन मस्क तुम्ही काय केले?' त्याच वेळी, तिसरा वापरकर्ता म्हणाला, 'ट्विटरमध्ये काय चालले आहे."


दरम्यान, ऑक्टोबरमध्ये 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर, मस्क यांनी ब्लू टीकसाठी सबस्क्रिप्शन सुरू करण्याच निर्णय घेतला होता. परंतु काही बनावट खात्यांवरही ब्ल्यू टीक असल्याने याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा लाँच केलेल्या सेवेची किंमत वेब ग्राहकांसाठी प्रति महिना 8 डॉलर्स आणि आयफोन ग्राहकांसाठी 11 डॉलर्स प्रति महिना असेल.