Twitter ad revenue: ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन सुरु केल्यानंतर यूजर्सच्या मनात ट्विटरबद्दल नाराजी पसरली होती. पण आता ट्विटरने त्याच्या युजर्सच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. ट्विटरने क्रिएटर्ससाठी एड्स रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्राम सुरु केलाआहे. हा प्रोग्राम क्रिएटर्सना त्यांच्या पोस्टवरील जाहिरातीतून कमाईची संधी देणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे क्रिएटर्सना ट्विटरवरुन कमाई करण्याचा एक नवीन मार्ग मिळाला आहे. ट्विटरवर आपले काम शेअर करुन आपल्या फॉलोअर्सशी नेहमी कनेक्ट राहणाऱ्या क्रिएटर्ससाठी ही मोठी संधी आहे. याअंतर्गत क्रिएटर्सना त्यांच्या कामाचे व्यावसायिकीकरण करण्याचा आणि त्यातून पैसे कमविण्याचा मार्ग मिळतो.


कंपनीने 'क्रिएटर्स एड्स रेव्हेन्यू शेयरिंग' पेजवर याची माहिती दिली आहे. आम्ही क्रिएटर्ससाठी रेव्हेन्यू शेअरिंग सहभागी करताना आपले क्रिएटर मॉनेटायझेशन विस्तृत केले आहे. क्रिएटर्सना त्यांच्या पोस्टवरील रिप्लायवरुन सुरु होणाऱ्या जाहिरातींमधील हिस्सा मिळू शकतो. यामुळे ट्विटरवर कमाई करण्याची संधी मिळेल, असे यात लिहिण्यात आले आहे. 


अनेक यूजर्सना मिळाली 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम


 एका ट्विटमध्ये असेही दिसून आले आहे की, लोकप्रिय यूट्यूबर मिस्टर बीस्ट (जेम्स डोनाल्डसन) यांनी जाहिरात शेअरिंग कमाईचा भाग म्हणून Twitter वरून $25,000 (रु. 21 लाख) कमावले आहेत. अनेक यूजर्सना 5 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे.


जिथे स्ट्राइप पेआउटला सपोर्ट मिळेल असा सर्व देशांमध्ये हा प्रोग्रमा लागू होईल. आम्ही ग्रुपने सुरुवात करत आहोत. ज्याला पेमेंट एक्सेप्ट करण्यासाठी आमंत्रित केले जाईल, अशी माहिती देखील देण्यात आली आहे. 


एक्स/ट्विटर क्रिएटर्सना त्यांच्या रिप्लायवर मिळालेल्या जाहिरातींचे पेमेंट मिळणे सुरु केले जाईल, असे एलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते. पहिले ब्लॉक पेमेंट $5 दशलक्ष इतके असेल, असेही ते पुढे म्हणाले होते. 


दरम्यान, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर आलेल्या माहितीनुसार '14 जुलैपासून, आम्ही एक नवीन मेसेज सेटिंग जोडत आहोत ज्यामुळे DM मधील स्पॅम मेसेजची संख्या कमी करण्यात मदत होईल.


नवीन सेटिंग सुरु झाल्यावर यूजर्स फॉलो करत असलेल्या लोकांचे मेसेज प्राथमिक इनबॉक्समध्ये जातील. तसेच ते फॉलो करत नसलेल्या व्हेरिफाइड यूजर्सचे मेसेज रिक्वेस्ट इनबॉक्समध्ये जातील.