Server Down : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील  ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सेवा आज ठप्प झाल्या होत्या. या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणारे युजर्सना सार्वधिक त्रास सहन करावा लागला. काही युजर्सनी यूट्यूबमध्ये समस्या असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, आता हळूहळू ही समस्या दूर केली जात आहे. दरम्यान, ट्विटरवर काही लोकांना त्रास होत असल्याचे ट्विटरवर सांगण्यात आले आहे. कंपनीला याबद्दल खेद आहे. ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ट्विटरच्या वापरकर्त्यांना मायक्रोब्लॉगिंग साईटवर लॉग इन करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामध्ये ट्विट करणे, मेसेज पाठवणे किंवा नवीन अकाउंटला फॉलो करणे यासारख्या समस्या येत होत्या. नवीन ट्विट पोस्ट करणाऱ्यां वापरकर्त्यांना एक मेसेज दिसत होता की आम्ही तुमचे ट्विट पोस्ट करण्यास सक्षम नाही . तसेच मायक्रोब्लॉगिंग साईटवॉर नवीन अकाउंटला फॉलो करण्याचा प्रयत्न करत असलेल्या वापरकर्त्यांना तुमची नवीन लोकांना फॉलो करण्याची मर्यादा संपली आहे असा मेसेज येत होता. 


तर दुसरीकडे आउटेज ट्रॅकर DownDetector च्या मते, ट्विटरच्या वापरकर्त्यांना गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून या समस्या येऊ लागल्या. पहाटे 4 ते 4.30 च्या दरम्यान 800 ते 850 वापरकर्त्यानी ट्विटरवर येणाऱ्या समस्यांबद्दल तक्रार केली. यामध्ये 43 टक्के वापरकर्ते अ‍ॅपवर, 25 टक्के वेबसाइटशी आणि 12 टक्के हे सर्व्हर कनेक्शनशी संबंधित आहेत. 


वाचा: 'वंदे भारत'मध्ये मिळणार अस्सल कोल्हापुरी तांबडा- पांढरा रस्सा अन्...; वाचा संपूर्ण मेन्यू 


याशिवाय अनेक यूजर्सने फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या सर्व्हरवरून सुद्धा तक्रार केली आहे. काही यूजर्सने यूट्यूब (youtube) संबंधी तक्रार केली आहे. परंतु, हळूहळू ही समस्या आता ठीक होत आहे. काही लोकांना ही समस्या येत असल्याचे ट्विटरकडून मान्य करण्यात आले आहे. यासाठी आम्हाला खेद असून लवकरच ही समस्या ठीक केली जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.