Twitter Users Policy : आतापर्यंत फक्त ब्लू टीक असलेल्या युजर्सनाच ट्विटर वापरण्यासाठी पैसे भरावे लागत होते. पण आता अशी ब्लू टीक (Twitter Blue Tick) नसलेल्या सामान्य युसर्जनाही (Users) ट्विटर वापरण्यासाठी पैसे भरावे लागू शकतात. यासाठी ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक बैठक घेतलीय. या बैठकीत ट्विटरच्या पॉलिसी  (Twitter Policy) बदलण्यासंबंधी चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटर वापरण्यासाठी फी? 


युजर्सना ट्विटरचा काही भाग वापरणंच फ्री असेल


प्रत्येक युजरला सबस्क्रिप्शन फी भरावी लागणार 


ब्लू टीकधारक युजर्सना अतिरिक्त सुविधा दिल्या जाणार



आतापर्यंत ट्विटर वापरायला फी आकारण्यावर एलॉन मस्क यांनी जाहीर विधान केलेलं नाही. पण काही दिवसांपूर्वीच ब्लू टीक धारकांसाठी ट्विटरनं फी आकारायला सुरुवात केली होती, त्याचंच पुढचं पाऊल म्हणून आता सरसकट सर्वांना ट्विटर वापरण्यासाठी पैसे भरावे लागतील, महिन्याभराच्या आत यावर निर्णय होईल अशी माहिती मिळतेय. त्यामुळे लाखो फॉलोवर्स असणा-या ट्विटर युजर्सचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.