मुंबई : सोशल मीडियाचा जमाना आहे... या मीडियात बरंच काही फक्त इमोजीच्या साहाय्यानं व्यक्त केलं जातं... हे आता ट्विटरलाही कळलंय... म्हणूनच पावसाचा आनंदही आता ट्विटरवर 'इमोजी'मधून व्यक्त करता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी ट्विटरनं आपल्या भारतीय युझर्ससाठी एक विशेष निळी छत्रीचं 'इमोजी' जाहीर केलंय. या छत्रीचं इमोजी १६ जूनपासून युझर्ससाठी लाईव्ह होईल. हे इमोजी ३१ ऑगस्टपर्यंत सक्रीय राहील. 


जेव्हा युझर्स देशातील वेगवेगळ्या भागांत मान्सूनला हॅशटॅग करून वापर करतील तेव्हा त्यांना एक चमकत्या निळ्या रंगाची छत्री हॅशटॅगनंतर दिसेल. 


याआधीही ट्विटरनं भारतीय संस्कृती ध्यानात घेता दिवाळी, गणेश चतुर्थी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंबेडकर जयंती दरम्यान असे इमोजी जाहीर केले होते.