Twitter युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, 21 सप्टेंबरपासून होणार...!
Twitter : ट्विटर युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्विटर वापरत असाल तर जाणून घ्या सविस्तर बातमी...
Tweet Editing Feature : जर तुम्ही ट्विटर (twitter) वापरत असाल तर तुम्हाच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण बहुप्रतिक्षित Twitter Edit Button सुरू करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्विटर 21 सप्टेंबरपासून एडिट ट्वीट बटन (Twitter Edit Button) रोल आउट करण्याची तयारी करत आहे. (twitter new feature of editing tweets a feature)
टायपिंग आणि व्याकरणाच्या चुका दुरुस्त करण्यासाठी ट्विटर वापरकर्ते अनेक वर्षांपासून tweet edit बटणाची मागणी करत होते. दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला Twitter ने लोकांसाठी वैशिष्ट्य रिलीझ करण्यापूर्वी अंतर्गत टीमसह ट्विट एडिट करा (Twitter Edit Button) या फिचरची इंटरनल टेस्टिंग सुरू केली आहे.
ट्विटरने येणाऱ्या काळात Twitter Blue ग्राहकांसाठी टप्प्या-टप्प्याने एडिट ट्वीट बटण सुरू करण्याचा आपला प्लानही शेअर केला होता. ट्विटर ब्लू एक सब्सक्रिप्शन सर्विस आहे, जी आपल्या सदस्यांना जाहिरात मुक्त आर्टिकल्स सारख्या प्रीमियम सुविधा प्रदान करते. ही सेवा सध्या केवळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आणि अमेरिकेत उपलब्ध आहे.
लोक या फीचरचा गैरवापर कसा करू शकतात हे पाहण्यासाठी ते जाणूनबुजून एका छोट्या गटासह एडिट ट्विटची चाचणी करत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, "हे वैशिष्ट्य लोकांच्या ट्विट वाचण्याच्या, लिहिण्यावर आणि गुंतण्याच्या पद्धतीवर कसा परिणाम करते ते देखील आम्ही पाहू शकतो"
असे काम करेल edit tweet feature
एडिट ट्वीट फीचर यूजर्सला ट्वीट पब्लिश झाल्यानंतर ३० मिनिटांपर्यंत ट्वीटमध्ये बदल करण्याची परवानगी देते. म्हटले जात आहे की, या दरम्यान युजर्स केवळ पाच वेळा आपले ट्विट एडिट करू शकतील. ट्विटरने कथितरित्या एडिट लिमिटला अंतिम रुप दिलेले नाही आणि भविष्यात यामध्ये बदल संभवतो. त्याचबरोबर ग्राहकांच्या टायपोमध्ये दुरुस्ती करणे, मीडिया फ़ाईलअपलोड करणे आणि टॅग जोड़ण्यास सक्षम असतील.
त्याचबरोबर असेही म्हटले जात आहे की, हे एडिट फीचर राजकीय माहितीचा गैरवापर किंवा क्रिप्टो स्कॅम प्रसाराला प्रोत्साहित केले जाऊ शकते. अशी प्रकरणे रोखण्यासाठी ट्विटरने आधीच घोषणा केली होती की, एडिटेड ट्वीट्सला एक आयकॉन, एक टाइम स्टॅम्प आणि एक लेबलने चिह्नित केले जाईल. यूजर ओरिजनल पोस्ट सह एखाद्या ट्वीटची संपूर्ण हिस्ट्री पाहू शकतात.