Twitter Account Blue Tick Check Subscription: ट्विटरचा मालकी हक्क एलोन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आल्यापासून रोजच्या रोज घडामोडी घडत आहेत. कर्मचारी कपातीपासून ते ट्विटरमध्ये नवे बदल केले जात आहेत. अमेरिकेतील अनेक बनावट ट्विटर अकाऊंट्सनी 8 डॉलर भरून ब्लू टिक (Twitter Blue Tick) मिळवले होते. यामुळे ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती. ट्विटरवरील फेक अकाउंट रोखण्यासाठी पाऊल उचलल्याचं होतं. आता सीईओ एलन मस्क यांनी पुन्हा एकदा ब्लू व्हेरिफाइडबाबत नवी घोषणा केली आहे. 'ब्लू टिक चेक मेंबरशिप सेवा 29 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू केली जाईल. अकाउंट 'रॉक सॉलिड' असल्याची खात्री करण्यासाठी ब्लू व्हेरिफाईड पुन्हा लाँच केले जात आहे.', असं ट्वीट एलोन मस्क यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प, सुपर मारिओ आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने बनावट खाती तयार करून ब्लू टिक्स घेण्यात आली होती. ब्लू टिकचा एका अमेरिकन फार्मा कंपनीला चांगलाच फटका बसला होतो. फार्मा कंपनी एली लिलीच्या नावे ब्लू टिक घेतली आणि 'आता इन्सुलिन मोफत मिळेल' असं ट्वीट केलं. या खोट्या ट्विटमुळे (Fake Account)  कंपनीचं 1,223 अब्ज रुपयांचे नुकसान झाले.अशी प्रकरणे समोर आल्यानंतर एलोन मस्क यांनाच पुढे यावे लागले होते. मस्क यांनी ट्विट करून म्हटले होते की, 'कोणत्याही ट्विटर अकाऊंटने दुसऱ्याच्या नावाने फेक अकाउंट बनवले तर ते बंद केले जाईल. जर तुम्हाला असं करायचं असेल तर बनावट खातं असल्याचं नमुद करावं लागेल.'



बातमी वाचा- Station Name: पिवळ्या बोर्डवर काळ्या रंगात का लिहितात रेल्वे स्टेशनची नावं? जाणून घ्या या मागचं कारण


यापूर्वी ब्लू टिकचे असे नियम होते


ट्विटरवर या ब्लू टिकचा अर्थ असा आहे की तुमचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड आहे. म्हणजेच बनावट नाही. लोकांना अशा लोकांच्या खऱ्या अकाऊंटची माहिती व्हावी आणि बनावट अकाऊंटच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून ही ब्लू टिक दिली जाते. एलोन मस्क यांनी ट्विटर घेण्याआधी ब्लू टिक फक्त सेलिब्रिटी, पत्रकार, नेते इत्यादींना मिळत होतं. ट्विटर ही खाती व्हेरिफाइड करत असे. मस्कच्या नवीन नियमानुसार, आता फोन, क्रेडिट कार्ड आणि दरमहा 8 डॉलक खर्च करण्याची क्षमता असलेल्या कोणालाही ब्लू टिक मिळू शकेल. मस्कच्या या निर्णयानंतर याचा फायदा घेत अनेक युजर्सनी इतर लोकांच्या नावाने फेक अकाउंट बनवले आणि नंतर रिव्हर्स ट्विट केले.