मुंबई : ट्वीटरवरती तुम्ही ब्लू टिक असलेले अनेक अकाउंट पाहिले असणार, ही ब्लू टिक पब्लिक इंटरेस्ट अकाउंटला ट्वीटरकडून दिले जाते. तसेच या अशा अकाउंटचे फॉलोअर्स देखील खूप असतात. परंतु सध्या ट्वीटरने जवळ जवळ अनेक पॉलिटिकल व्यक्तींचे हे ब्लू टिक हटवले आहे. ट्वीटरने आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या देखील ट्वीटर हँडलवरुन ही ब्लू टिक काढली आहे. मोहन भागवतांसह, अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार, सरकार्यवाह सुरेश जोशी, सह-सरकार्यवाह सुरेश सोनी आणि कृष्णगोपाल जी यांच्या ट्वीटर हँडलवरूनही ब्लू टिक हटवण्यात आली आहे. ही टिक हटवण्या मागचे कारण अजूनही ट्वीटरने दिलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्वीटरने उपराष्ट्रपति (Vice President) एम. वेंकैया नायडू यांच्या देखील हँडलवरून ही ब्लू टिक हटवली होती. परंतु काही तासातच ही टिक परत आली. परंतु दुसऱ्या पॉलिटिकल व्यक्तींच्या हँडलवर हे ब्लू टिक अद्याप आलेले नाही.


ब्लू टिक प्राप्त करण्यासाठी, यूझर्सचे खाते प्रामाणिक, उल्लेखनीय आणि सक्रिय असणे आवश्यक आहे. ब्लू टिक मिळणे म्हणजेच ट्वीटरद्वारे या खात्याची ओळख पटवून प्लॅटफॉर्मवरील यूझर्समधील विश्वास वाढवणे आणि त्यांचा विश्वास राखणे. ट्वीटरच्या मते, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या जनतेचे हित लक्षात घेऊन खात्यांच्या सत्यतेबद्दल लोकांना माहिती देऊन लोकांशी संवाद साधण्याच्या वचनबद्धतेचा ब्लू टिक एक भाग आहे.


अकाउंट वेरिफाइड होण्यासाठी ते खाते नोटेबल, खरे आणि सक्रिय असणे आवश्यक आहे. ट्वीटरच्या या फिचरमध्ये 6 प्रकारच्या खात्यांमध्ये सरकारी कंपन्या, ब्रँड, वृत्तसंस्था आणि पत्रकार, करमणूक, क्रीडा आणि एस्पर्ट्स, कार्यकर्ते, संयोजक आणि इतर प्रभावीत अकाउंटचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने  @handle असे आपले यूझर नेम चेंज केले, तर तो अकाउंट इनएक्टिवेट किंवा इनकंम्पलीट होतो. त्यामुळे देखील ट्वीटरवरील ब्लू टिकला हटवले जाते.


तसेच काही लोकांनी ट्वीटरच्या काही नियमांचे उल्लंघन केले किंवा काही चुकीची माहिती दिली, तरी त्यांच्या अकाउंटवरुन ही टिक ट्वीटरकडून हटवली जाऊ शकते, परिणामी खाते निलंबित होते. त्यानंतर घृणास्पद आचार धोरण, अपमानास्पद वागणूक, हिंसाचाराच्या धोरणाचे गौरव, नागरी अखंडता धोरण, वैयक्तिक माहिती धोरण किंवा प्लॅटफॉर्ममध्ये बदल करणे किंवा स्पॅम मॅसेज यामुळे देखील ट्वीटर अकाउंट्स हटवले जाते.