मुंबई  :  सोशल मीडियावर कोणताच सेन्सॉर नसतो तसेच तुमची ओळख लपवून समोरच्यावर टीका करता येत असल्याने अनेकदा अश्लाघ्य भाषेत टीपण्णी केली जाते.  


ट्विटरवर टीका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वर्ष ट्विटरवरही अब्युझिव्ह भाषेतील कन्टेट, इमेजेस याबददल कटःओर भूमिका नव्हती. त्यामुळे अनेकदा ट्विटरवर टीका होत असे. 


ट्विटरचे नवे नियम  


ट्विटरवर आता द्वेष पसरवणारे किंवा घाणेरड्या भाषेत प्रोफाईल फोटो, बायोमधील माहिती किंवा युझर नेम असल्यास त्यांच्यावर ट्विटर कारवाई करणार असल्याची माहिती ReCodeच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे.   


 
काय कोणार कारवाई 


ट्विटरच्या नव्या नियमांचा भंग करणार्‍या अकाऊंट्सवर ट्विटर तात्काळ कारवाई करणार आहे. यामध्ये ट्विटरची अकाऊंट्स तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी प्रकारात रद्द केले जाऊ शकते. तसेच  द्वेष किंवा घाणेरडे मेसेज पसरवणार्‍यांची ओळख पटवून त्यावर कारवाई होणार आहे.  


ट्विटरने यापूर्वी केआरकेचं ट्विटर अकाऊंंट सस्पेंड केले होते.