२ महत्वाच्या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा
पहिली गोष्ट देशाच्या भल्यासाठी आणि दुसरी गोष्ट स्वत:च्या जीवासाठी.
शांघाय : हा व्हिडीओ नीट पाहा आणि २ गोष्टी आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, त्यापैकी १) पहिली गोष्ट देशाच्या भल्यासाठी आणि २) दुसरी गोष्ट स्वत:च्या जीवासाठी.
या दोन गोष्टी अशा आहेत, १) पहिली गोष्ट चीनी मालाचं काही खरं नाही, त्याला धक्का लागला नाही, कोणतंही वजन पडलं नाही, तरीही त्याची वाट लागू शकते, एवढा चीनी बनावटीचा माल कमकूवत असतो, आणि २) दुसरी गोष्ट वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका.
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे हा मोठा गुन्हा आहे, चीनमध्ये ग्वांग्शी येथे मुख्य रस्ता खचल्याची घटना समोर आली. रस्ता खचला त्याच्या काही वेळानंतर एक दुचाकीस्वार तिथून जात होता, पण फोनवर बोलण्याच्या नादात रस्ता खचल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. तो थेट या खड्ड्यात जाऊन पडला.