मुंबई : अवघ्या एका क्लिकवर आता दारात टॅक्सीची सोय उपलब्ध झाल्याने अनेक प्रवासी सुखावले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'उबर'सारखी  आंतरराष्ट्रीय कंपनी आता लवकरच मोबाईलप्रमाणे लॅपटॉपवरूनही टॅक्सी बुकिंगची सोय खुली करणार आहेत. 


येत्या शुक्रवारपासून लो वेब व्हर्जनमध्ये उबर आता स्मार्टफोनशिवायही बुक करण्याची सोय खुली होणार आहे.  


 तीन नवी फीचर्स येणार 


ऑफलाईन सर्च, रिक्वेस्ट फॉर  गेस्ट आणि कॉल टू राईड अशी तीन नवी फीचरदेखील उबरकडून प्रवाशांना देण्यात येणार आहेत. 
ऑफलाईन सर्चमध्ये लिमिटेड नेटवर्कमध्येही रायडर्सना टॅक्सी बुक करता येईल.  
रिक्वेस्ट फ़ॉर गेस्टच्या माध्यमातून तुम्ही इतरांसाठी उबर टॅक्सी बुक करू शकाल. एसएमएसच्या माधय्मातून इतर माहिती दिली जाईल. 
कॉल टू राईडमध्ये फोन नंबरच्या माध्यमातून प्रवासी आपला प्रवास आणि टॅक्सिची सेवा ठरवू शकतात. 
                   सध्या हे फीचर केवळ पुण्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.