मुंबई  : आधारकार्ड हे पॅनकार्ड, मोबाईल सीम, पॉलिसी आणि बॅंक खात्यांसोबत लिंक करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी सरकारने दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या नव्या नियमानुसार आधारकार्डशी संबंधित सेवा लिंक न केल्यास ती अकाऊंट बंद होणार आहेत. पण युआयडीआयने मात्र आज एअरटेलला दणका दिला आहे.  


काय  केली कारवाई ? 


भारती एयरटेल व एयरटेल पेमेंट्स बॅंकचे अकाऊंटवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनुसार त्यांनी ई केवायसी व्हेरिफिकेशन तात्पुरता काही वेळासाठी बंद ठेवण्यात  आली आहे.  


का झाली कारवाई  


सुमारे 23 लाखाहून अधिक ग्राहकांच्या एअरटेल बॅंक खात्यामध्ये 47 करोड रूपये जमा झालेले मेसेज मिळाले. मात्र ही अकाऊंट उघडल्याची माहिती  त्यांना नाही. अखेर युआयईडीने हा बाबत तपास सुरू केला आहे. या अकाऊंटमध्ये आता एलपीजी सबसिडी मिळत आहे.  


एअरटेलची आधारकार्ड लिंकिंगची सेवा स्थगित  


सध्या एअरटेल ई केवायसी / बायोमॅट्रिकच्या माध्यमातून त्यांच्या ग्राहकांचे फोन आधारकार्डासोबत लिंक करू शकणार नाही.