Union Budget 2022: प्रतीक्षा संपली! या वर्षी सुरु होणार 5G सेवा, जाणून घ्या सर्वकाही
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. देशातील 5G सेवा आणि 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.
Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज 2022-23 या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. देशातील 5G सेवांबाबत दूरसंचार आणि डिजिटल जगाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात 5G सेवा 2022-23 पासून म्हणजेच या वर्षापासून सुरू होईल आणि 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबतही निर्णय देण्यात आला आहे.
देशात 5G सेवा सुरु होणार
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या वर्षापासून देशातील लोकांना 5G सेवांचा लाभ घेण्याची संधी मिळेल.
5G स्पेक्ट्रमचा लिलाव
तसंच खासगी कंपन्यांकडून 5G मोबाइल सेवा सुरू करण्यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये केला जाईल, अशी घोषणाही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे.