Cheapest Electric Car:  कोरोना संसर्गानंतर ऑटो क्षेत्रात पुन्हा मागणी वाढली आहे. तसेच सरकारसमोर सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या स्विकृती आणि जागरूकतेची आव्हाने आहेत. कच्च्या मालाच्या खर्चात वाढ झाल्याचा थेट परिणाम इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींवर होताना दिसत आहे. बॅटरी आणि इतर घटकांच्या किमती कमी झाल्यास ईव्हीची मागणी आणखी वाढू शकते. याचपार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याच्या दृष्टीकोनातून पाऊलं उचलली जात असल्याचं यंदाच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी वाहन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये जुन्या वाहनांच्या बदल्यात नवी इलेक्ट्रिक वाहनं मिळणार. तसेच वाहने बदलणे, प्रदूषण वाढवणारी वाहने बदलणे किंवा स्क्रॅप करणे हरित वातावरणासाठी आवश्यक आहे. याचा सर्वात मोठा फायदा प्रदूषण कमी करण्यात होणार आहे. ज्यामुळे हरित वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. तसेच 2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोटारगाड्या स्वस्त होणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. ज्याचा थेट फायदा सामान्य माणसाच्या खिशात होईल आणि देशातील उत्पादन क्षमता वाढवता येईल. इलेक्ट्रिक वाहनांबाबत सरकारचा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती रास्त ठेवून बहुतांश ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे.


वाचा: ग्राहकांनो ऐकले का...ऐन लग्नसराईत सोने-चांदी महागणार! 


ऑटो क्षेत्रासाठी काय तरतुदी? 


  • जुन्या वाहनांच्या बदल्यात नवी इलेक्ट्रिक वाहनं मिळणार. 

  • वाहने बदलणे, प्रदूषण वाढवणारी वाहने बदलणे किंवा स्क्रॅप करणे हरित वातावरणासाठी आवश्यक आहे.

  • इलेक्ट्रिक वाहन धोरणासंबंधित राज्याला मदत केली जाईल, जेणेकरून जुनी वाहने बदलता येतील.

  • जुन्या रुग्णवाहिकाही बदलण्यात येणार असून, त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

  • इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होतील.