मुंबई : टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांमध्ये युद्ध सुरू आहे, स्वस्त प्लानसाठी कंपन्या आता नवनवीन प्लान घेऊन येत आहेत. यात अनलिमिटेड कॉल आणि भरपूर ऑनलाईन कॉलिंग देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्होडाफोन इंडियाने देखील आपल्या प्रिपेड कस्टमर्सना फेस्टिव सिझनची ऑफर देऊन, 399 रूपयांचा नवीन प्लान सादर केला आहे.


काय आहे ऑफर?


व्होडाफोनचं 399 रूपयांचं रिचार्ज करून, कस्टमर्सना 6 महिन्यांसाठी 90 जीबी डेटा आणि कॉलिंग फ्री मिळणार आहे, मात्र तुमचा फोन 4 जी असणे आवश्यक आहे. या आधी व्होडाफोनने 84 दिवसात 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची योजना दिली होती.


कुणाला आहे ऑफर


मात्र नवीन ऑफर सर्व कस्टमर्सना दिलेली नाही, काही निवडक कस्टमर्सना दिली आहे. अनेकवेळा अशी ऑफर तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर बदलून येतात त्यावेळी दिली जाते. त्याच अटीवर कोणत्याही मोबाईल कंपनीची पोर्टबिलिटी स्वीकारली पाहिजे.


एअरटेलची ऑफर


याशिवाय एअरटेलनेही 4 जी युझर्सना 399 रूपयात 28 दिवसांसाठी प्रत्येक दिवशी 1 जीबी डेटा आणि इतरांना प्रत्येक दिवशी 1.25 जीबी डेटा दिला आहे. यात अनलिमिटेड कॉल्स आणि नॅशनल रोमिंगचा देखील समावेश आहे.


बीएसएनएलची ऑफर


बीएसएनएलने देखील आपल्या लक्ष्मी प्रमोशनल ऑफरच्या माध्यमातून 290, 390 आणि 590 च्या रिचार्जवर प्रीपेड युझर्सना 50 टक्के अतिरिक्त टॉकटाईम दिला आहे. कोणत्याही कंपनीची ऑफर घेण्यापूर्वी सविस्तर माहिती घेतल्यानंतर, खात्री केल्यानंतरच रिचार्ज करणे आवश्यक आहे, अनेक वेळा कंपन्या अशा ऑफर्स काही ग्राहकांना देत नाहीत.