UPI Payment Charges: सध्याच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जातात. यासाठी UPI ची फार मदत होते. UPI मुळे प्रत्यक्ष बँकेत न जाता लाखो रुपयांचा व्यवहार एका क्षणात करता येतो. अनेकदा काहीजण घराबाहेर पडताना सोबत पैसे घेऊन बाहेर पडत नाही. कारण google pay, phone pay , bhim upi, amazon pay, paytm यासारख्या अॅपच्या भरोसावर घराबाहेर पडत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला या अॅपमधून UPI Transaction करायचे असेल तर बँक (bank account) खात्यात पैसे असणे गरजेचे असायचे. मात्र आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आगामी काळात UPI पेमेंटला चालना मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये RBI ने जाहीर केले आहे की, बँक खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही UPI पेमेंट करू शकाल... 


वाचा: ब्रोकोली खायला आवडते का? जाणून घ्या शरीराला काय होतात फायदे 


ऑनलाइन पेमेंट कसे करणार?


जर तुमच्या बँक खात्यात पैसे नसल्यास UPI पेमेंट होत नाही. पण जर तुम्ही फोन वॉलेटमध्ये आधीच काही पैसे जमा केले असतील तर त्याच्या मदतीने ऑनलाइन पेमेंट करता येईल. मात्र, तुम्हाला हे पैसे तुमच्या वॉलेटमध्ये आगाऊ जोडावे लागतील. परंतु नवीन सुविधेत, जर तुमच्या वॉलेट आणि बँक खात्यात पैसे नसतील तर तुम्ही बँकेकडून पैसे घेऊ शकाल.


क्रेडिट कार्डचे टेन्शन नाही त्रास संपेल


ही सुविधा क्रेडिट कार्ड सारखी असणार आहे. वापरकर्ते केवळ ऑनलाइन मोडद्वारे क्रेडिट कार्डसारख्या सुविधेचा आनंद घेऊ शकतील. यासाठी तुम्हाला व्याज द्यावे लागेल, तेही क्रेडिट कार्डप्रमाणेच. म्हणजे येत्या काही दिवसांत क्रेडिट कार्ड घेऊन जाण्याचा त्रास संपणार आहे.


बँकेचे वेळेवर पैसे भरा


या सुविधेमध्ये वापरकर्ते क्रेडिट कार्डप्रमाणे निश्चित रक्कम कर्ज घेऊ शकणार आहात. यासाठी बँका प्रत्येक वापरकर्त्याची क्रेडिट लाइन, एखादी व्यक्ती किती कर्ज घेऊ शकेल हे आधीच ठरवतील. त्याचप्रमाणे तुम्ही भारत उदार UPI पेमेंटची देय रक्कम निश्चित वेळेत न भरल्यास तुमच्याकडून अतिरिक्त व्याज आकारले जाईल.