Broccoli Health Benefits : ब्रोकोली खायला आवडते का? जाणून घ्या शरीराला काय होतात फायदे

Benefits of Broccoli  : अनेकजण फिटनेसबाबत जागरुक असल्यामुळे आहारात ब्रोकोलीचा समावेश करतात. ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय उत्तम असून ब्रोकोलीचा वापर बऱ्याचदा सॅलेडमध्ये केला जातो. आजकाल भारतीय भाजी मार्केटमध्येदेखी ब्रोकोली मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे ती एक कुठेही सहज उपलब्ध होणारी भाजी आहे.    

Apr 10, 2023, 12:21 PM IST
1/7

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

ब्रोकोलीमध्ये बीटी केरोटिन मुबलक प्रमाणा असते. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकते. वयोमानानुसार होणार मोतिबिंदू, काचबिंदू यापासून बचाव होण्यासाठी नियमित ब्रोकोली अवश्यक खा. 

2/7

गर्भवती महिलांसाठी उत्तम

गर्भधारणेदरम्यान स्त्रीला पोषक तत्वांची गरज असते. अशा परिस्थितीत त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रोकोली बर्‍याच प्रमाणात प्रभावी आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम मुलांची हाडे मजबूत करते. याशिवाय ब्रोकोली हे प्रथिने, लोह, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन केचा एक चांगला स्रोत आहे. जे गर्भवती महिलेसाठी आवश्यक पोषक मानले जातात. 

3/7

वजन कमी होते

ब्रोकोलीच्या भाजीत पाणी आणि फायबर्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे तिच्या सेवनाने तुमचे वजन कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी उकडलेली ब्रोकोली सॅलेडमध्ये टाकून दोन्ही वेळच्या जेवणासोबत खा. तसेच उच्च फायबर आहारामुळे पोटाच्या सर्व समस्या दूर करते आणि पचनसंस्था सुधारते.  

4/7

हाडे मजबूत होतात

हाडे आणि दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत ब्रोकोली हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शिवाय ब्रोकोलीमध्ये फॉस्फरस, झिंक आणि व्हिटॅमिन ए, सी देखील मुबलक असते. ज्यामुळे हाडांना बळकटी येते. 

5/7

पचनसंस्था सुधारते

ब्रोकोलीमध्ये हेपॅटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात ज्यामुळे यकृताला सर्व गंभीर आजारांच्या धोक्यापासून बचावतात. नेहमीच्या जेवणाच ब्रोकोलीचा वापर केला तर पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. ब्रोकोली नियमित खाल्यामुळे तुमच्या पोटाचे विकार हळूहळू कमी होतील.

6/7

कर्करोगापासून बचाव

बदलती जीवनशैली आणि व्यसनांचे वाढलेले प्रमाणामुळे आजकाल कर्करोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर आहारात नियमित ब्रोकोलीचा वापर केला तर स्तनाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगापासून संरक्षण मिळू शकते. कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यासाठी ब्रोकोली फायदेशीर आहे. 

7/7

हृदयासाठी उपयुक्त

नियमित ब्रोकोली खाण्यामुळे ह्रदयातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. त्याशिवाय ब्रोकोलीमध्ये असलेले सेलेनियम आणि ग्लुकोसिनोलेट्स सारखे घटक हृदयाला निरोगी ठेवणारे प्रथिने वाढवण्याचे काम करतात. तसेच यामध्ये असलेले उच्च फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते. म्हणून निरोगी ह्रदयासाठी तुमच्या आहारात ब्रोकोलीचा वापर जरुर करा.