मुंबई : condom म्हटलं की आपल्या समोर येतं ते अनिश्चित धोका. हा धोका फक्त शारिरीक नसून तर तो आपल्याला दररोजच्या वापरातही मिळू शकतो. याचकरता USB Condom चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून USB Condom जगभरात लोकप्रिय होत चालला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याला कारण ही तसंच अगदी खास आहे.  आपण मोबाइल चार्ज करण्यासाठी अनेकदा USB पोर्टचा वापर करतो. याच USB पोर्टमार्फत होणारा धोका टाळण्यासाठी USB Condom चा वापर करणे महत्वाच ठरणार आहे. USB condom किंवा USB Blocker म्हणून याकडे पाहिलं जातं. 


ज्यावेळी तुम्ही मोबाईल किंवा टॅबलेट इलेक्ट्रिसिटी म्हणजे चार्जिंग करण्यासाठी वापरता तेव्हा USB Condom तुमच्या उपकरणातील data transfer ही सिस्टीम बंद करून टाकते. त्यामुळे तुमच्या मोबाईलमधील अतिशय महत्वाच्या गोष्टी चोरी होण्यापासून रोखणार आहेत. 


महत्वाच म्हणजे या डिवाइसची किंमत ही जवळपास 500 रुपयांपर्यंत असणार आहे. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्हणजे PortaPow USB data blocker. हे उपकरण तुमचा मोबाईल चार्जिंगला लावल्यावर फक्त चार्जिंगच करणार. त्यामधून इतर कोणत्याही गोष्टींची चोरी होत नाही. 


अनेकदा मोबाइल चार्जिंगला लावताना USB चा वापर केल्यास तुमच्या मोबाईलमधील अत्यंत महत्वाचे पासवर्ड, महत्वाचे ऍप चोरी होण्यापासून रोखलं जातं. USB Charging Scam पासून स्वतःचा मोबाईल वाचवण्यासाठी याची मागणी वाढत आहे. मध्यंतरी ‘Juice Jacking’ नावाचा प्रकार सुरू झाला होता. त्यात तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावला की तो हॅक केला जाऊ शकत होता.


सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग करताना प्रत्येकाने या USB Condom चा वापर करायला हवा. कारण अशा ठिकाणी अनेकदा महत्वाच्या गोष्टी चोरी होण्याची शक्यता असते. यामध्ये बँकेचे किंवा इतर पासवर्डचा समावेश असतो.