मुंबई : आपल्या फोनवरून समोरच्या व्यक्तिला फोन लावायचा असल्यास फोनमध्ये सिमकार्ड हवे असते हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच, एका सीमवरून एकच नंबर वापरता येतो हेही अनेकांना माहिती असते. पण, तुम्हाला माहिती आहे का, एकाच सीमवरून तुम्ही दोन नंबर वापरू शकता. ते सुद्धा अगदी फ्री...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला जर एका सीमवरून दोन नंबर वापरायचे असतील तर, तर सर्वप्रथम तुमच्याकडे एक स्मार्टफोन असायला हवा. स्मार्ट फोन असल्यास तुम्हाला दोन नंबर वापरण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागणार नाहीत. आपल्याला मोबाईलमध्ये केवळ एक अॅप इनस्टॉल करावे लागेल. यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एकाच वेळी एकाच सीमवरून दोन नंबर वापरू शकाल.


कसे वापराल दोन नंबर? ही आहे ट्रीक


  • आपल्या स्मार्टफोनच्या गूगल प्ले स्टोअरमध्ये जा. तेथून Text Me – Free Texting & Calls हे अॅप डाऊनलोड करा.

  •  हे अॅप डाऊनलोड होताच कोणत्याही एका जीमेलवरून अकाऊंट तयार करा. हे अकाऊंट लॉगइन करा.

  • अॅप लॉगइन होताच डिस्प्लेवर सर्वात खाली क्रेडिट, कॉन्टॅक्ट, इनबॉक्स, नंबर आणि मी असे पाच पर्याय तुम्हाला दिसू लागतील. या पर्यायांपैकी नंबर हा पर्याय निवडून त्यातून तुम्हाला हवा तो नंबर तुम्ही निवडू शकता. महत्त्वाचे असे की, इथे नंबर निवडताना तुम्हाला काही प्रमाणात पैसे मोजावे लागतील. आवश्यक तेवढे पैसे मोजून तुम्ही वेगवेगळ्या देशातही ही सुविधा वापरू शकता.

  • हे अॅप आपण मोबाईलमध्ये इनस्टॉल केल्यावर तुम्हाला एक नंबर मोफत मिळतो. जो तुम्ही कॉल करण्यासाठी वापरू शकता.

  • विशेष म्हणजे अशा प्रकारे कॉल केल्यावर तुम्हाला क्रेडीटही मिळते.



कसा वापराल नंबर


तुम्हाला जर तुमच्या मूळ नंबरवरून फोन करायचा असेल तर, त्यासाठी नियमीत पद्धत वापरावी लागेल. पण, तुम्हाला फ्रीवाल्या नंबरवरून कॉल करायचा असेल तर, तुम्हाला अॅपच्या माध्यमातून कॉल करावा लागेल. अॅपमधून कॉल करतानाही तुम्हाला नेहमी असते तशीच कॉन्टॅक्ट नंबरची यादी येईल. ज्यातून तुम्ही आवश्यक तो नंबर निवडू शकाल. या नंबरवरून तुम्ही मेसेजही करू शकता.