मुंबई : तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात आणि फोनमध्ये कॉलर ट्युन सेट करायची आहे? मग ही बातमी नक्की वाचा. रिलायन्स जिओतर्फे आपल्या ग्राहकांना मोफत कॉलिंग, इंटरनेट डेटा सारख्या सुविधा देण्यात येत आहेत. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण अशीही एक सुविधा आहे जी पहिल्यापासून अगदी मोफत आहे. मात्र, या सेवेसंदर्भात फारच कमी युजर्सला माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ ट्युन व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिस आहे ज्याच्या मदतीने युजर्स आपल्याला आवडतं गाणं कॉलर ट्युन सेट करु शकता. कॉलिंग ट्युन सेट केल्यानंतर तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तिला गाणं किंवा म्युझिक ऐकायला मिळेल.


जिओ ट्युन सेट करण्यासाठी तुमच्या गुगल प्ले किंवा अॅप स्टोअरमधून म्युझिक डाऊनलोड करु शकता. अॅपमध्ये ब्राऊज करुन तुम्ही आवडती जिओट्युन सेट करु शकता. 


अॅपच्या माध्यमातून कॉलर ट्युन सेट करण्याच्या स्टेप्स


- गाण्यांचं कॅटेगरी पेज उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्स असलेल्या ड्रॉप डाऊन मेन्यूवर क्लिक करा. या ठिकाणी ‘Set As JioTune’ या पर्यायाला निवडा.


- यासोबतच तुम्ही प्लेयर मोडमधील कुठलंही गाण्याला ‘Set As JioTune’ बटनावर क्लिक करुन अॅक्टिव्हेट करु शकता.