या कोडने पाहू शकता स्मार्टफोनची सिक्रेट माहिती
कदाचित फार थोड्या स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांना हे माहित असेल की आपल्या फोनची माहिती आपल्याला कशी मिळेल.
नवी दिल्ली : कदाचित फार थोड्या स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांना हे माहित असेल की आपल्या फोनची माहिती आपल्याला कशी मिळेल.
स्मार्टफोनमध्ये असे काही कोड असतात जे टाईप केल्य़ानंतर तुम्हाला तुमच्या फोनची माहिती मिळू शकते. या कोडला युएसएसडी कोड असं म्हणतात. (Unstructured Supplementary Service Data)
फोनवर हे कोड डायल करून, फोनमधली असलेली माहिती तुम्हाला मिळू शकते. फोनची डिस्प्ले स्क्रीन मेमरी, रॅम, कॅमेरा आणि फोन डेटा, फोन लायसेन्स, सॉफ्टवेअर याबाबतची माहिती तुम्हाला मिळू शकते.
महत्त्वाचे कोड
*#*#4636*#*#
हा कोड फोनच्या टेस्टींगसाठी वापरतात. यामध्ये फोन आणि वाय-फायची माहिती मिळते. तसेच NFC आणि टेस्ट अॅलर्ट देखील दिले जातात.
*#07*#
हा कोड डायल करुन फोनची हिस्ट्री पाहू शकता. फोनचं सर्टिफिकेट देखील यामध्ये पाहता येतं.
*1#
आपल्याला आपला सिम नंबर माहित नसल्यास हा कोड काम करू शकतो. या मदतीने वापरकर्ता त्याच्या नंबर काढू शकतो.