तुमच्या मुलांना या चिमुकली रोबियाचं गाणं नक्की ऐकवा !
रोबिया हे झुबी डुबी गाणं नुकतंच हिंदी दिनाच्या निमित्ताने व्हायरल झालं. हिंदी येत नसतानाही तिने हे गाणं सुंदर गाणं गायलंय.
जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : बॉलीवूडचं गाणं गाणारी ही चिमुकली उझबेकिस्तानची आहे, तसेच तिचं नाव रोबिया असल्याचंही नेटीझन्सने आपल्या प्रतिक्रियांमध्ये म्हटलं आहे, उझबेकिस्तानची लहानगी रोबिया झुबी डुबी गाणं खूप सुंदर गाते.
रोबियाचं थ्री इडियट सिनेमातलं झुबी डुबी गाणं नुकतंच हिंदी दिनाच्या निमित्ताने पुन्हा व्हायरल झालं. हिंदी येत नसतानाही तिने हे गाणं सुंदर गायलंय.
चिमुकली रोबियाला या गाण्याचे बोल स्पष्टपणे येत नसलं, तरी त्यात एक गोडवा नक्कीच येतोय, यामुळे नेटीझन्सने या लहानगीचं कौतुक केलं आहे.
या चिमुकलीने अनेक बॉलीवूड गाणी गायली असल्याचं यूट्यूब व्हिडीओवरून दिसतंय.
उझबेकिस्तान आणि भारताच्या राजकीय संबंधांना २२ मार्च २०१७ रोजी २५ वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी रूस्तम आणि रोबिया यांनी अनेक बॉलीवूडची गाणी गायली.