मुंबई : व्होडाफोन-आयडिया (Vi) ने आपली स्वस्त आणि लोकप्रिय योजना जोरदार मागणीमुळे भारतीय बाजारात परत आणली आहे. कंपनीच्या मते ही यूझर्सना परवडणारी प्रीपेड रिचार्ज योजना आहे, जी ग्राहकांना एक्टिव्ह करण्यासाठी फक्त 109 रुपये खर्च करावा लागणार आहे.


ग्राहकांना या सुविधा मिळणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेअंतर्गत कंपनी ग्राहकांना 1 जीबी हाय स्पीड डेटा, तसेच अमर्यादित विनामूल्य लोकल-एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगसह 300 लोकल आणि इंटरनॅशनल SMS ची सुविधा देत आहे.


या सुविधा तुमचा प्लान अॅक्टिव्ह झाल्यानंतर पुढील 20 दिवस उपलब्ध राहाणार. त्याचबरोबर, दैनंदिन मर्यादा संपल्यानंतरही इंटरनेट चालू राहिल, फक्त त्याचा वेग थोडा कमी होईल. व्होडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणाच्या वेळी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या या योजनेला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणूनच कंपनीने याला पुन्हा सुरू केले आहे.


149 रुपयांची योजनाही चांगली


आतापर्यंत, 149 रुपयांची व्होडाफोन-आयडिया प्री-पेड योजना बाजारात सर्वात स्वस्त मानली जात होती. जी 28 दिवसांच्या वैधतेसह येते. या योजनेत दररोज 3 जीबी डेटा उपलब्ध आहे. याशिवाय मोफत कॉलिंग आणि 300 SMSचा लाभही ग्राहकांना दिला जातो. एवढेच नव्हे तर कंपनी आपल्याबरोबर 1 जीबीचा अतिरिक्त डेटा, Vi मूव्हिज आणि टीव्ही सबक्रिप्शन देखील देत आहे.