नवी दिल्ली : आपण कंम्प्युटवर, मोबाईलवर गेम खेळत बसलो की आपल्याला अनेकदा ओरडा पडतो. एका जागी बसून गेम खेळणाऱ्यांना तसे आळशीच संबोधले जाते. त्याचबरोबर गेम खेळण्याचा अतिरेक आरोग्यासाठी घातक असल्याचे सांगितले जाते. मात्र गेम खेळल्यामुळे कोणी श्रीमंत झाल्याचे तुमच्या ऐकण्यात नसेल.


गेम खेळून झाला श्रीमंत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण २६ वर्षीय डॅन मिडल्टननं  व्हिडिओ गेम्स खेळण्याचा आपला छंद जपत त्याचा पैसे कमवण्यासाठी वापर केला. थोडेथोडके नव्हे तर त्याने त्यातून इतकी बक्कळ कमाई केली की २०१७ मधल्या सर्वाधिक श्रीमंत यूट्युबरच्या यादीत डॅन सर्वात वरच्या स्थानावर येवून पोहोचला.


इतके आहे उत्पन्न


‘फोर्ब्स’च्या माहितीनुसार डॅनचं वार्षिक उत्पन्न सुमारे ८०-९० कोटी आहे. डॅनचा ‘DanTDM’नावाचा यूट्युब चॅनेल आहे. त्यातून तो व्हिडिओ गेम्सचे रिव्ह्यू  देतो. त्याचे  गेम्स रिव्ह्यू चांगलेच लोकप्रिय ठरले. त्याचे व्हिडिओज दीड कोटींहून अधिक लोकांनी पाहीले आहेत. 


डॅननंतर हा चिमुकला आहे श्रीमंत


डॅननंतर सर्वात श्रीमंत यूट्युबरच्या यादीत सहा वर्षांचा रायनचा क्रमांक लागतो. त्याची वर्षिक कमाई ही ७० कोटी असून रायन हा जगातील सर्वात लहान श्रीमंत यूट्युबर आहे.