COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : वेगवान मुंबापुरी रोजच बदलते, आणि आपल्या बरोबर मुंबईकरांना आणि वास्तूंनाही बदलायला लावते, यूट्यूबवर १९६२ सालातला मुंबईचा एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे, याआधी तो ब्लॅक अॅण्ड व्हॉईट होता, आता तो रंगीत स्वरूपात अपडेट करण्यात आला आहे. ब्रिटीश पाथचा हा मूळ व्हिडीओ आहे. साधारण ५५ वर्षापूर्वीची मुंबई कशी होती, त्यावेळचं जनजीवन, मुंबईकरांची राहणी कशी होती, कोणत्या प्रकारची वाहनं रस्त्यावर होती, याचा अंदाज नक्की येतो.