Viral News : पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दराने शंभरी गाठली असतानाच इंधनाला पर्याय म्हणून बाजार इलेक्ट्रीक गाड्या (Electric Vehicle) आल्या. इलेक्ट्रीक स्कुटर आणि इलेक्ट्रीक कारला मोठी मागणी आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्या एकदा चार्च केल्या की अनेक किलोमीटर धावतात. शिवाय प्रदुषणाची कटकटही नाही. त्यामुळे इंधनाला पर्याय ठरणाऱ्या इलेक्ट्रीक गाड्या रस्त्यावर दिसू लागल्या आहेत. पण आता लवकरच आता तुमची कार बिअरवरही (Beer) धावू शकेल. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना. पण हो आता हे शक्य असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये करण्यात आलाय. हा मेसेज इतका वेगानं व्हायरल होतोय की यावरच चर्चा रंगू लागल्यायत. बिअरपासून इंधन बनवण्यात संशोधकांना यश आल्याचा दावा केला जातोय...आता या व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहुयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल मेसेज
पेट्रोल डिझेल नसलं तरीही तुमची गाडी चालू शकेल आता बिअरवरही कार चालणं शक्य आहे.. असं व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे. पण, बिअरवर कार चालेल हा दावा थोडा वेगळा असल्यानं याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसं बघायला गेलं तर 600 एमएलची बिअर सध्याच्या घडीला दीडशे ते 200 रुपयांपेक्षा अधिक किमतीत मिळते. त्यामुळे बिअर ही खर्चिक असल्याने हे सामान्यांना परवडणारी नाही.


पण, एका बिअरमध्ये किती किलोमीटर कार चालेल हेही मेसेजमध्ये लिहिलेलं नाही.. बिअरवर चालणारी कार सामान्यांना परवडेल का...? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आमच्या व्हायरल पोलखोल टीमनं या मेसेजची पडताळणी सुरू केली. याबद्दल एक्सपर्टशी बोलून त्यांच्याकडून माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली ते पाहुयात...


व्हायरल पोलखोल
बिअरमध्ये इथेनॉल असल्याने कार चालू शकते. पण बिअरवर कार चालवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. तसंच कार्बन मोनोऑक्साईड, सल्फरडाय ऑक्साईडमुळं वायू प्रदूषण होईल. शिवाय मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊ शकतं


बिअरवरच नव्हे तर अल्कोहोलमध्ये इथेनॉल असल्याने त्यापासूनही कार चालवणं शक्य असल्याचं मत तज्ज्ञांचं आहे. पण, ते खर्चिक असून, त्याचा दुष्परिणामही होऊ शकतो. गाडीचं जबरदस्त नुकसानही होऊ शकतं. ऐकायला जरी हा प्रयोग चांगला वाटला तरी तो सामान्यांना परवडणारा नाही. पण, आमच्या पडताळणीत बिअरवर कार चालू शकते हा दावा सत्य ठरला आहे.