मुंबई : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचं हे काही वर्षापूर्वीच भाषण व्हायरल होत आहे. उदयनराजे भोसले यांच्या व्हिडीओंविषयी तरूणांमध्ये प्रचंड वेड आहे. हे यूट्यूबच्या व्हिडीओंवरून लक्षात येतं. उदयनराजे हे नेहमीच चर्चेत असतात, त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे. उदयनराज यांना जेवढा आक्रमकपणा पाहिला जातो, किंवा तो आक्रमकपणा जेवढा चर्चेत असतो, त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल जेवढी चर्चेत असते. तसंच काहीसं उदयनराजे यांचं भावूक होणं देखील चर्चेत असतं. उदयनराजे हे अनेकांना आदर्श मानतात,  आणि आपल्या आदर्शांविषयी ते भरभरून बोलतात, आणि जाहीर सभेत भावूक देखील होतात. खालील व्हिडीओ देखील काही तसाच आहे. हा व्हि़डीओ सध्या व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उदयनराजे यांचे अनेक व्हिडीओ आहेत, यात उदयनराजे रस्त्यावरील माणसांची जावून भेट घेतात. शेतात जाऊन त्यांच्यासोबत जेवतात. पंगतीत मांडी घालून उदयनराजे जेवतात. हे यूट्यूबवर प्रचंड लोकप्रिय होत आहे. उदयनराज यांचे आक्रमक व्हिडीओ देखील यूट्यूबवर आहेत. एकंदरीत महाराष्ट्राच्या जनतेला उदयनराजे यांच्या लाईफस्टाईलविषयी, त्यांच्या वागण्याबोलण्याविषयी आकर्षण आहे.