देशातला सगळ्यात स्वस्त फोन लॉन्च
मोबाईल कंपनी वीवानं भारतीय बाजारात त्यांचा पहिला फिचर फोन लॉन्च केला आहे.
मुंबई : मोबाईल कंपनी वीवानं भारतीय बाजारात त्यांचा पहिला फिचर फोन लॉन्च केला आहे. VIVA V1 हा फोन भारतातला सगळ्यात स्वस्त फोन असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. वीवा ही एक स्टार्टअप कंपनी असून VIVA V1 हा त्यांचा पहिलाच फोन आहे. या फोनची किंमत फक्त ३४९ रुपये एवढी आहे. तसंच या फोनमध्ये स्नेक गेमही देण्यात आला आहे.
१५ दिवसांचा स्टँडबाय बॅकअप
650mAh क्षमेतची बॅटरी असलेल्या या फोनला १५ दिवसांचा स्टँडबाय बॅकअप असेल. निळ्या आणि ऑरेंज या दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. सध्या हा फोन ई-कॉमर्स वेबसाईट शॉपक्लूज (www.shopclues.com)वरून विकत घेता येईल.
फोनचे फिचर्स
१.४४ इंचाचा मोनोक्राम डिस्प्ले
वायब्रेटर, एफएम रेडिओ आणि टॉर्च
सिंगल सिम, २जी नेटवर्क सपोर्ट
एसएमएस, फोनबूक, कॅलक्युलेटर, कॅलेंडर
या किंमतीमधले इतर फोन
आर १२८०- ३९९ रुपये
स्मार्टवन एस २- ६०९ रुपये
इंटेक्स इको बीट्स- ६९० रुपये
जिओ फिचर फोन- १,७४० रुपये