मुंबई: तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण नुकतीच Vivo कंपनीच्या एका जबरदस्त फोनचे फीचर्स लीक झाले आहेत. या फोनचे फीचर्स खूपच भारी आहेत. vivo कंपनी लवकरच एक नवा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्याचे फीचर्स लाँच होण्याआधी लीक झाले आहेत. X70 Pro या मॉडेलसाठी एसआईजी आणि सिंगापूरच्या आईएमडीए अधिकाऱ्यांकडून सर्टिफिकेट मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

X70 प्रो अलीकडेच गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर Dimensity 1200 चिप, 12GB RAM आणि Android 11 OS मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. व्हॅनिला एक्स 70 अलीकडे गीकबेंचवर त्याच वैशिष्ट्यासह युझर्स समोर येईल. असं मानलं जातं की चीनमध्ये जाणाऱ्या Vivo X70 सीरिज वेगवेगळे मॉडेलमध्ये उपलब्ध होणार आहे


V2130A आणि V2134A फोन जे चीनच्या 3C प्राधिकरणाने जुलैमध्ये मंजूर केले ते X70 आणि X70 प्रो स्मार्टफोन असू शकतात. हे 5G रेडी फोन 44C फास्ट चार्जरसह मार्केटमध्ये उपलब्ध होईल असं सांगितलं जात आहे . Vivo X70 Pro+ 66W फास्ट चार्जरसह मार्केटमध्ये येऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे. 


f/1.5 अॅपर्चरसह  5-एक्सिस इमेज स्टेबिलाइजेशनसह हा फोन बाजारात येण्याची शक्यता आहे. 6.56-इंच AMOLED FHD+ डिस्प्ले या फोनमध्ये मिळेल. हा फोन सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकतो अशी मार्केटमध्ये चर्चा आहे.  X70 साधारण किंमत 45,000 तर X70 प्रोची किंमत  50,000 रुपये आणि X70 Pro+ साधारण 70 हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.