Vivo Y02s Launch Date, Specifications, Price under Rs 10000: विवो स्मार्टफोन कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमुळे मोबाईलप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण महागडा स्मार्टफोन खरेदी करणं, सर्वांनाच परवडतं असं नाही. त्यामुळे स्वस्तात मस्त फोनची अनेक जण आतुरतेने वाट पाहात असतात. आता चीनी स्मार्टफोन ब्रँड विवोने नवा YO2s लाँच करण्याची तयारी केली आहे. हा स्मार्टफोन 10 हजार रुपयात मिळणार असून स्टायलिश आणि जबरदस्त फीचर्स आहेत. चला तर मग या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Vivo YO2s हा बजेट स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमद्ये सिंगल 3GB RAM आणि 32 GB स्टोरेज असलेला व्हेरियंट 9 हजार रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. विवोचा नवा स्मार्टफोन YO2s कधी लाँच होणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण 28 जुलैला हा स्मार्टफोन लाँच होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा फोन या तारखेला जागतिक बाजारपेठेत लाँच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसापासून भारतात मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. 


मीडिया रिपोर्ट आणी लीक्सनुसार Vivo YO2s मध्ये 6.51 इंचच एचडी+रेझोल्यूशनवाला डिस्प्ले आणि 60 एचझेड हा रिफ्रेश रेट आहे. तसेच 5000mahची बॅटरी असून 10W चार्जिंक सपोर्ट आणि 5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करेल, हा स्मार्टफोन Mediatek Helio P35 Soc प्रोसेसरवर काम करेल, असं सांगण्यात येत आहे. यात 8 एमपीचा प्रायमरी कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश लाईट आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचं झालं तर, YO2s अँड्रॉईड 12 आउट ऑफ द बॉक्सवर चालेल.