मुंबई : रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर अनेक टेलीकॉम कंपन्यांसमोर आपला ग्राहक टीकवून ठेवणे हे आव्हान बनले आहे. आपला युजरबेस आहे तोच ठेवण्यासाठी वेगवेगळे प्लान ऑफर करण्यात येत आहेत.


ग्राहकांना आकर्षित 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गेल्या काही दिवसात जिओ व्यतिरिक्त एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि बी.एस.एन.एल सारख्या मोठ्या कंपन्यांनी यूजर्ससाठी नवनव्या ऑफर्स आणल्या. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वोडाफोननेही सुविधा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत, कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट केलेले यूजर्स विनामूल्य डेटा वापरू शकतात


नोएडात पहिले शेल्टर


व्होडाफोन इंडियाने नोएडाच्या सेक्टर -18 मध्ये फ्री-वायफाय-युक्त शेल्टर सुरू केले आहे.  नोएडात व्होडाफोनने सुरु केलेला हा पहिला वाय-फाय बस शेल्टर आहे. या शेल्टरच्या मदतीने आपण दररोज २० मिनिटे वाय-फाय सेवेचा लाभ घेऊ शकता. 


२० मिनिटे फ्री


तुम्ही व्होडाफोन युजर्स नसाल तरीही या सेवेचा लाभ घेऊ शकता. 


म्हणजेच कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट असलेला युजर २० मिनिटांसाठी वाय-फाय सेवा वापरू शकतो.