मुंबई : वोडाफोन - आयडिया आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा जास्त ऑफर घेऊन येत असते. आता कंपनीने आपला फ्लॅगशिप प्लॅन रेडएक्स आणि रेडएक्स फॅमिली  प्लान सुरू केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना UNLIMITED INTERNET  डेटा वापरता येणार आहे. एकाच बिलात सामील होणाऱ्या सदस्यांना याचा लाभ  मिळत आहे. एकच बिल त्यांच्या कुटुंब योजनेसाठी आहे, ज्यामध्ये इतर क्रमांकांसह एक प्राथमिक क्रमांक आहे. ही योजना फक्त पोस्टपेड सदस्यांसाठी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे ऑफर?


1,699 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त 3 सदस्य सामील होऊ शकतात. तर 2299 रुपयांच्या प्लॅनमध्ये पाच लोकांना जोडले जाऊ शकते. घरातून वर्क फ्रॉममुळे डेटा वापर  वाढला आहे अशा वेळी, कंपनीने या संधीचे भांडवल करण्यासाठी दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत.


वोडाफोन आयडियाच्या रेडएक्स फॅमिली प्लानमध्ये ग्राहकांना  UNLIMITED 4G डेटा मिळेल. या व्यतिरिक्त, Netflix, Amazon Prime आणि Disney +  Hotstar तसेच VI Movies & TV मध्ये VIP प्रवेश उपलब्ध असेल.


2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 7  दिवसीय आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकेज देखील उपलब्ध असेल. तसेच, विशेष ISD दरांचा लाभ अमेरिका, यूके आणि मध्य पूर्वसह 14  देशांसाठी उपलब्ध असेल. यासह, प्राथमिक सदस्य वर्षातून 4 वेळा मोफत लॉच सेवा घेऊ शकतात. त्यात एकवेळच्या आंतरराष्ट्रीय विश्रामगृहाचाही समावेश आहे.