मुंबई : व्होडाफोन-आयडियाने आपल्या प्रीपेड यूझर्ससाठी नवीन ऑफर बाजारात आणली आहे. या ऑफरमध्ये टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या यूझर्सना 1 हजार 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये झी 5 चा प्रीमियम बेनिफिट्स देण्यास सुरूवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्होडाफोन-आयडियाच्या बर्‍याच योजनांमध्ये झी5 चे सब्सस्क्रिप्शन विनामूल्य दिले जात आहे. या यादीमध्ये व्होडाफोन-आयडियाचे 555, 405, 595, 795, आणि  2 हजार 595 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे.


व्होडाफोन-आयडियाची 1 हजार 197 रुपयांची ही योजना 2019 मध्ये बाजारात आली. या योजनेअंतर्गत, यूझर्सना 180 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा दिला आहे. या पॅकमध्ये, यूझर्सना प्रत्येक शनिवार आणि रविवारी डेटा रोलओव्हरची सुविधा देखील मिळत आहे.


या व्यतिरिक्त, यूझर्सना 100 एसएमएस, अनलिमिटेड डेटा कॉलिंग,  अनलिमिटेड Night डेटा सुविधा आणि झी 5 ची एक वर्षाचे सब्सस्क्रिप्शन मिळत आहे. तसेच आर Vi Movies आणि टीव्ही एप्लिकेशन चा फायदा मिळत आहे.


या सर्व ऑफर्ससह, व्होडाफोन-आयडियाने होम क्रेडिटसोबत देखील हात मिळवणी केली आहे, या अंतर्गत यूझर्सना स्मार्टफोनमध्ये सूट आणि ऑफर देखील देण्यात आल्या आहेत.