मुंबई : Vodafone Idea Prepaid Plans under Rs 500 Benefits Revised: जर तुम्ही Vi यूजर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी. व्होडाफोन आयडियाने बंपर ऑफर आणली आहे. 500 रुपयांपेक्षा कमी पैशांमध्ये 100GB पेक्षा जास्त डेटा तुम्हाला मिळणार आहे. काय हा प्लान आणि त्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात अनेक टेलिकॉम कंपन्या असल्या तरी प्रामुख्याने तीन खासगी कंपन्यांमध्ये स्पर्धा दिसून येत आहे. आता व्होडाफोन आयडिया अर्थात Vi. अलीकडे, व्होडाफोन आयडियाने आपल्या यूजर्ससाठी धमाका ऑफर आणली आहे. Vi ने दोन  500 रुपयांपेक्षा प्रीपेड प्लानमध्ये काही मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे यूजर्सना त्याच किंमतीच्या त्या प्लानमध्ये अधिक फायदे मिळत आहेत.  


व्होडाफोन आयडियाने या योजनांचे फायदे वाढवले 
 
खासगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea ने अलीकडेच त्यांच्या दोन प्रीपेड प्लानमध्ये बदल केले आहेत. जे या प्लानच्या फायद्यांशी संबंधित आहेत. Vi ने त्याच्या 409 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन आणि 475 रुपयांच्या प्रीपेड प्लान डेटाच्या फायद्यात वाढ केली आहे. 


Vi चा 475 रुपयांचा प्लान 


सर्वप्रथम, Vi च्या 475 रुपयांच्या प्रीपेड प्लानबद्दल जाणून घेऊया. ज्याची वैधता 28 दिवस आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज 4GB डेटा दिला जात आहे, याचा अर्थ असा आहे की एकूण हा प्लान यूजर्सला 112GB डेटा देत आहे. दररोज 100 SMS आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह, हा प्लान तुम्हाला Vi Movies आणि TV अ‍ॅप आणि कंपनीच्या विशेष वीकेंड डेटा रोलओव्हर आणि Binge रात्रभरची स्कीम मिळत आहे.


Vi चा 409 रुपयांचा प्लान 


 475 रुपयांच्या प्लानपेक्षा 66 रुपये स्वस्त, 409 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत, या प्लानमध्ये दररोज 3.5GB डेटा मिळतो. या प्लानची वैधता देखील 28 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्हाला Vodafone Idea चे स्पेशल वीकेंड डेटा रोलओव्हर आणि Binge ऑल नाईट बेनिफिट देखील दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला Vi Movies आणि TV चे सदस्यत्व दिले जात आहे.