मुंबई : वोडाफोन इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी स्पेशल रिचार्ज प्लान आणलाय. या प्लानमध्ये कंपनीने ३४९ रुपयांच्या रिचार्जवर प्रत्येक दिवसाला १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड लोकल, एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळेल. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. याचाच अर्थ ग्राहकांना ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये ४२ जीबी डेटा मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्लानमध्ये कॉलसाठी मर्यादा ठेवण्यात आलीये. ग्राहक दिवसाला २५० मिनिटे आणि आठवड्याच अधिकाधिक १००० मिनिटे फ्री कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय या प्लानमध्ये वोडाफोन ग्राहकांना वोडाफोन प्लेचे सबस्क्रिप्शनही देण्यात येईल. 


काही दिवसांपूर्वीच एअरटेलने ३४९ रुपयांचा प्लान जाहीर केला. या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दिवसाला १.५ जीबी डेटा दिला जात आहे. 


वोडाफोनने ४५८ रुपयांचा प्लानही आणलाय यात सर्व प्रीपेड ग्राहकांना 3G/4G दोन्ही हँडसेटवर दिवसाला १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. याशिवाय दिवसाला १०० मेसेज मिळणार आहेत. या प्लानची व्हॅलिडिटी ७० दिवसांसाठी आहे.